Tuesday, June 18, 2024
Tuesday, June 18, 2024

HomeFact CheckViral'आप' च्या विजयामुळे आनंदी होऊन पत्रकार राजदीप देसाईंनी डान्स केला?  वाचा सत्य

‘आप’ च्या विजयामुळे आनंदी होऊन पत्रकार राजदीप देसाईंनी डान्स केला?  वाचा सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आम आदमी पार्टीचा विजय झाल्याच्या खुशीत स्टुडिओत डान्स केला.

Verification
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने एक हाती सत्ता राखल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. हे निकाल विविध वृत्तवाहिन्यावरुन लाईव्ह दाखवले जात होते, मात्र या इंडिया टुडेच्या स्टुडिओमध्ये निकालादरम्यान ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी डांस केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून. त्यांनी आम आदमी पार्टीच्या विजयाच्या हर्षोल्लासात हा डान्स केल्याचा दावा करण्यात येत आहे. ही निष्पक्ष पत्रकारिता आहे का असा प्रश्न देखील विचारण्यात येत आहे.
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता राजदीप जनसत्तामध्ये याबद्दलची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, निकालाचा अंदाज बरोबर आल्याने माय एक्सिसचे एमडी प्रदीप गुप्ता आणि पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी स्टूडिओतच डान्स केला.
या बातमीत कुठेही आम आदमी पार्टीच्या विजयाने आनंदित होऊन प्रदीप गुप्ता आणि राजदीप सरदेसाई यांनी डांस केल्याचे म्हटलेले नाही.
याशिवाय आम्हाला राजदीप सरदेसाई यांचेही ट्विट आढळून आले.
त्यांनी म्हटले आहे की आम्ही अंदाज खरा ठरला म्हणून डांस केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या वेळीही आमचा अंदाज खरा ठरला असल्याचे सरदेशाई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय आम्हाला इंडिया टुडेच्या बातमीचा व्हिडिओ देखील यूट्यूबवर आढळून आला. यात देखील एग्जिट पोल खरा ठरल्याने आनंदाच्या भरात दोघांंनी डान्स केल्याचे म्हटले आहे.
यावरुन हेच सिद्ध होते की पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आम आदमी पार्टीच्या विजयामुळे नव्हे तर एग्जिट पोलचा अंदाज खरा ठरल्याने डान्स केला. सोशल मीडियात चुकीच्या दाव्यानिशी त्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली.
Sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular