Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

HomeFact CheckViralहल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस सापडल्याचा खोटा दावा व्हायरल

हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस सापडल्याचा खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर हल्दीरामच्या एका व्हिडिओवरून वादविवाद झाला. त्यात असा दावा केलाय की, हल्दीरामवाले फलाहारी नमकीनमध्ये मांस मिसळताना पकडले गेले आहे.  

सुदर्शन न्यूज वाहिनीने हा व्हिडिओ दाखवला होता, जो व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर तो व्हिडिओ काही दिवसांपासून खूपच चर्चेत आहे. 

सुदर्शन न्यूजच्या त्या व्हिडिओत पत्रकार हल्दीरामच्या एका आऊटलेटमध्ये व्यवस्थापकाशी प्रश्न-उत्तरे देतांना दिसत आहे. 

त्या पत्रकाराचे म्हणणे आहे की, हल्दीरामने हिंदूंच्या उपवासासाठी फलाहारी नमकीनवर उर्दूमध्ये का लिहिले आहे आणि कंपनी यातून काय लपवत आहे ? यावरून त्या पत्रकार आणि आऊटलेटच्या व्यवस्थापकामध्ये जोरदार वादविवाद झाला.

ही पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर खूपच व्हायरल झाली. काही दिवसांपूर्वी नवरात्रोत्सवात मांसाहारी खाण्याचा मुद्दा खूपच चर्चेत होता. काही ठिकाणी नवरात्रोत्सवात मांसाहारीची दुकाने बंद करण्याबाबत बातम्या आल्या होत्या. 

यातच आता या सुदर्शन न्यूजच्या वादविवादाचा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. ज्यात एक पत्रकार हल्दीरामच्या एका आऊटलेटमध्ये व्यवस्थापकाशी प्रश्न विचारताना दिसत आहे. सध्या हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Fact Check / Verification

व्हायरल होणारा हा व्हिडिओ दहा मिनिटांचा आहे. आम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकला. पण यात कुठेही फलाहारी नमकीनमध्ये मांस मिळवल्याची गोष्ट बोललेली नाही. अशा वाक्याचा या व्हिडिओमध्ये कुठलाही उल्लेख केलेला नाही.

यात फक्त एका ठिकाणी पत्रकार स्टोर व्यवस्थापकाला विचारले की, हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये जनावरांचे तेल की बीफ तेल वापरले जाते. या प्रश्नाला कंटाळून तो काहीच उत्तर देत नाही. तो फक्त एवढंच म्हणतो की, ज्याला जे समजायचंय ते त्याने समजून घ्यावे.

हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये कोणते पदार्थ वापरले जातात, हे तपासण्यासाठी आम्ही ते पॅकेट पाहिले. जिथे सर्व पदार्थांची यादी दिली होती. 

हल्दीरामच्या फलाहारी नमकीनचे हेच पॅकेट व्हिडिओत दाखवून सुदर्शन वाहिनीचा पत्रकार त्या आऊटलेटमधल्या कर्मचाऱ्यांना प्रश्न-उत्तरे विचारतांना दिसत आहे. 

खाद्यपदार्थाचा स्क्रिनशॉट – अ‌ॅमेझॉन डॉट कॉम

नमकीनच्या त्या पॅकेटवर हिरव्या रंगाचा एक ठिपका दिसत आहे. याचा अर्थ असा की, हे खाद्यपदार्थ शाकाहारी आहे. 

त्या पॅकेटवर भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण म्हणजेच एफएसएसएआयचा लोगो देखील दिसत आहे. त्याचा अर्थ असा की, खाद्यपदार्थांच्या प्रमाणानुसार हे तयार केले आहे.

पॅकेटवर ‘उर्दू’मध्ये काय लिहिले आहे ?

सदर पॅकेटवर उर्दूत नाही तर अरबी भाषेत माहिती लिहिली आहे. आमच्या अरबी भाषेच्या व्यक्तीने माहिती दिली की पॅकेटवर नमकीन बनवण्यासाठी वापर होणाऱ्या पदार्थांची यादी अरबीत लिहिली आहे. 

ती यादी इंग्रजीत देखील लिहिलेली आहे. हे वाचल्यावर स्पष्ट लक्षात येते की, यात कुठलाही मांसाहारी पदार्थ वापरलेला नाही. 

पॅकेटवर अरबी लिहिण्याचे कारण काय ?

या संदर्भात बोलण्यासाठी न्यूजचेकरने हल्दीरामच्या कोलकाता क्षेत्राचे प्रमुख शरद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला. शरद द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलतांना म्हणाले की हल्दीरामचे खाद्यपदार्थ दुबई, इटली, स्पेन, फ्रान्स सारख्या विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. 

प्रत्येक देशाच्या नियमानुसार, खाद्यपदार्थाची माहिती तिथल्या स्थानिक भाषेत देणे अनिवार्य आहे. याच कारणांमुळे आम्ही आमच्या खाद्यपदार्थांवर विविध भाषांचा वापर करतो. हल्दीरामच्या फलाहारी पॅकेटवर ‘इंपोर्टेड बाय, एसटीसी / दुबई’ असं लिहिलेले दिसत आहे. 

हे वाचू शकता : शेतात विहीर खोदतानाचा तो व्हिडिओ अमरावतीचा नाही, चुकीचा दावा व्हायरल होतोय

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस मिळवल्याचा दावा खोटा आहे. त्याचबरोबर हल्दीरामवाले फलाहारी नमकीनमध्ये मांस मिळवतांना पकडले गेले, ही देखील एक अफवा आहे.

Result : False Context/False 

Our Sources


स्वतः केलेले विश्लेषण

द टाइम्स ऑफ इंडियाची बातमी

अ‌ॅमेझॉन डॉट कॉम

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular