Friday, June 14, 2024
Friday, June 14, 2024

HomeMarathiराज्यातील या प्रमुख नेत्यांनी एकत्र तान्हाजी चित्रपट पाहिला नाही, व्हायरल झाला खोटा दावा 

राज्यातील या प्रमुख नेत्यांनी एकत्र तान्हाजी चित्रपट पाहिला नाही, व्हायरल झाला खोटा दावा 

Authors

Claim

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनी एकत्र तान्हाजी चित्रपट पाहिला. 

Verification
पुणेरी टोमणे या फेसबुक पेजवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रमुख शरद पवार, भाजपाचे नेते देवेंद्र फड़णवीस आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा एकत्रित फोटो शेअर करण्यात आला असून यात म्हटले आहे की सगळे नेते एकत्र तान्हाजी सिनेमा पाहत आहेत आणि कार्यकर्ते मात्र बाहेर आपापसात भांडत आहेत.
आम्ही याबाबत पडताळणी सुरू केली. गूगलवर यासंदर्भात शोध घेतला असता या नेत्यांनी एकत्रित तान्हाजी चित्रपट पाहिल्याची बातमी कोठेही आढळली नाही. यानंतर आम्ही हा फोटो नेमका कधीचा आहे हे पडताळून पाहण्यासाठी गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर हा फोटो आढळून आला. 
Screenshot 2020-01-22 at 5.07.10 PM.png
आज तक च्या बातमीनुसार हा फोटो गेल्यावर्षीचा आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला होता. 
सीएमओच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की कलर्स वाहिनीच्या मानाचा मुजरा- बाळासाहेब हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. 
यावरुन हेच स्पष्ट होते की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो हा एक वर्षापूर्वीच्या आहे. वरील चारही नेत्यांनी मिळून तान्हाजी सिनेमा पाहतानाचा हा फोटो नाही तर बालासाहेब ठाकरेवरील गेल्या वर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील फोटो आहे. 
Sources
  • Google Reverse Image 
  • Facebook Search 
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular