सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष युद्धभूमीवर उतरले? हे आहे व्हायरल फोटोचे सत्य
रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष युद्धभूमीवर उतरले असल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल झाला आहे. यात युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की हे लष्कराच्या गणवेशात मोहीमेवर जात असतानाचा दिसत आहेत. पण आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष युद्धभूमीवर उतरले असल्याचा फोटो जुना आहे त्याचा सध्याच्या परिस्थितीशी संबंध नाही. फॅक्ट चेक इथे वाचा.
Russia-Ukraine conflict मध्ये ISKCON द्वारे मदतकार्याच्या नावाने व्हायरल झाले जुने फोटो
Russia-Ukraine conflict मध्ये ISKCON द्वारे मदतकार्य केले जात असल्याच्या दाव्याने फोटो व्हायरल झाले आहेत.रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे युक्रेनमधील मानवतावादी संकट अधिक गडद होत आहे. पण आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की ISKCON द्वारे मदत कार्य सुरु असल्याच्या दाव्याने सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो जुने आहेत. फॅक्ट चेक इथे वाचा.
लहान मुलीचा जीव वाचवणाऱ्या जवानाच्या धाडसाचा व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा नाही
सोशल मीडियात व्हायरल झालेला लहान मुलीचा जीव वाचवणाऱ्या जवानाच्या धाडसाचा व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे. पण आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, डेव्हिड यूबँक नावाच्या व्यक्तीने इराकमध्ये मुलीला इस्लामिक दहशतवाद्यांपासून वाचवले असून तो पाचवर्षांपुर्वीचा आहे. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.
युक्रेनच्या नावाने व्हायरल होत असलेल्या शीख सेवा सोसायटीने आयोजित केलेल्या लंगरचा फोटो 6 वर्षे जुना
युक्रेनमध्ये शीख समुदायाच्या पुढाकाराने गुरु का लंगर आयोजित करण्यात आल्याचा दावा करत एक फोटो मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पण युक्रेनमध्ये लंगर सुरु करण्यात आल्याच्या दाव्याने व्हायरल होत असेला फोटो चुकीचा आहे मात्र या चुकीच्या माहितीचे शिकार अभिनेत्री ऋचा चढ्ढा, ज्येष्ठ पत्रकार अजित अंजुम देखील झाले आहेत. फॅक्ट चेक इथे वाचा.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ Russia-Ukraine conflict दरम्यानचा नाही
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ Russia-Ukraine conflict दरम्यानचा असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ Russia-Ukraine Conflict दरम्यानचा नसून वातावरणातील बदलाबाबतच्या धोरणांविरोधात आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात केलेल्या आंदोलनाचा आहे. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.