Claim– सोनिया गांधी हिंदूंचा तिरस्कार करतात, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पुस्तकात खुलासा

Verification–
सोशल मीडिया मध्ये काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविषयी एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सोनिया गांधी हिंदूंचा तिरस्कार करत असल्याचा उल्लेख माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या The Coalition Years या पुस्तकात केला आहे.
आम्ही याबाबतीत पडताळणी सुरु केली असता आम्हाला याच दाव्याची तीन वर्षापूर्वीची एक बातमी डेलीहंट या वेबसाईटवर आढळून आली. यात म्हटले आहे की, प्रणब दा यांनी खुलासा केला आहे की सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात हिंदूंना टारगेट करुन फसविले गेले आहे. नोव्हेंबर 2004 मध्ये कांग्रेसची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांतच दिवाळीच्या वेळी शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना एका हत्येच्या प्रकरणात अटक केली होती. त्यांना जेव्हा अटक केली तेव्हा ते 2500 वर्षांपासून सुरु असलेली त्रिकाल पुजेची तयारी करत होते. अटकेनंतर त्यांच्यावर अश्लील सीडी पाहणे आणि विनयभंगाचे घाणेरडे आरोप केले गेले. परंतु हे आरोप कधीच सिद्ध झाले नाहीत. प्रणव मुखर्जी यांनी द कोलिएशन इयर्स 1996-2012 या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, मैं या अटेकमुळे खूप नाराज होते आणि कॅबिनेटच्या बैठकीत मी हा मुद्दा देखील उपस्थित केला होता. मी प्रश्न केला होता की, धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा फक्त हिंदू-संत महात्म्यांपुरता मर्यादित आहे का ? एखाद्या राज्यातील पोलिस एखाद्या मुस्लिम मौलवीला ईदच्या दिवशी अटक करण्याची हिम्मत दाखवू शकतील का ?

याशिवाय आम्हाला भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांचे दोन वर्षापूर्वीचे ट्विट आढळले. यात त्यांनी देखील हाच दावा केला आहे. स्वामी यांनी Postcard.news या वेबसाईटवरील बातमी शेअर केली होती.
Sonia Gandhi hates Hindus! This truth is revealed by none other than Former President Pranab Mukherjee https://t.co/YBF7tMjy4h via @postcard_news
— Subramanian Swamy (@Swamy39) February 4, 2018
मुखर्जी यांच्या पुस्तकाचे ते पान आम्हाला सोशल मीडियात आढळून आले.

यानंतर आम्ही शंकराचार्यांच्या अटकेच्या बातम्या शोधल्या असता आज तक च्या वेबसाईटवर बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, जयललिता यांनी शंकराचार्यांना त्रिकाल संध्या पूजा करत असताना अटक केली होती.

यावरुन हेच स्पष्ट होते की, जयललिता यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात तामिळनाडू पोलिसांनी हत्येच्या आरोपात शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना अटक केली होती. केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला नव्हता. प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकात सोनिया गांधी यांचा उल्लेख देखील नाही. सोशल मीडियात चुकीच्या पद्धतीने या पुस्तकातील मजकूर व्हायरल करण्यात आला आहे.
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)