Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeMarathiदीपिकाने लोकसभा निवडणुकीत केला नव्हता भाजपचा प्रचार, खोटा दावा पुन्हा व्हायरल

दीपिकाने लोकसभा निवडणुकीत केला नव्हता भाजपचा प्रचार, खोटा दावा पुन्हा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

2019 में दीपिका पादुकोण देशभक्त थी और आज #JNU में आने के बाद देशद्रोही हो गयी नचनियां हो गयी? वाह रे दोगलो हद हो गयी।

मराठी अनुवाद- दीपिका पादुकोण 2019 मध्ये देशभक्त होती आणि आज जेएनयुमध्ये येताच देशद्रोही झाली, नाचणारी झाली, वा रे वा दुटप्पीपणाची हद्दच झाली.
Verification
बाॅलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतीच जेएनयूमध्ये राड्यानंतर भेट दिली असता ती टॅोल झाली. यानंतर सोशल मीडियात तिच्याविषयी काही पोस्ट व्हायरल झाल्या.
अशीच एक पोस्ट आम्हाला ट्विटर वर आढळली. या ट्विटमध्ये दीपिकाचे आणिर रणवीरसिंग दे दोघे भाजपचा प्रचार करत असतानाचा फोटो शेअर केला असून म्हटले आहे की, दीपिका पादुकोण 2019 मध्ये देशभक्त होती आणि आज जेएनयुमध्ये येताच देशद्रोही झाली, नाचणारी झाली, वा रे वा दुटप्पीपणाची हद्दच झाली.
ट्विटमध्ये एक अर्थाने असे म्हटले आह की दीपिका जोपर्यंत बीजेपीच्या बाजूने होती तोपर्यंत देशभक्त होती आणि आता ती जेएनयूमध्ये जाताच तिला देशद्रोही ठरवण्यात आले आहे.
याबाबता शोध सुरु असताना आम्हाला आणखी काही याच दाव्याच्या पोस्ट आणि ट्विट्स आढळून आले.
आम्ही दीपिका पादुकोणने खरंच भाजपाचा प्रचार केला होता का या संबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला एप्रिल 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान एक फेसबुक पोस्टमध्ये सध्या व्हायरल होत असलेला दीपिका आणि रणवीरचा फोटो दिसून आला. यात दोघांनी Vote For Bjp  लिहिलेले उपरणे गळ्यात अडकवलेले दिसते.

Ek Bihari 100 Pe Bhari

जय श्री राम #Vote4Bjp #NamoAgain

हा फोटो आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या सहाय्याने शोधला असता News18 या वेबसाईटवर 3 डिसेंबर 2018 रोजी प्रकाशित लेखात दीपिका आणि रणवीरच्या विवाहातील फोटो गॅलरी शेअर करण्यात आली आहे त्यात  दोघांचा हा फोटो दिसून आला. लेखात दिलेल्या माहितीनुसार दीपिका आणि रणबीर यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले यावेळीचा हा फोटो आहे. आपण हा ओरिजनल फोटो खाली पाहू शकता.
यावरुन हेच स्पष्ट होते की, दीपिकाने भाजपाचा प्रचार केला नव्हता दीपिका आणि रणवीरचा खरा फोटो एडिट करुन लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते दोघे भाजपाचा प्रचार करत असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर दीपिका आत्ता जेएनयूमध्ये विद्यार्थांना मारहाण झाल्यानंतर पोहचल्यानंतर देखील जुनाच एडिट फोटो शेअर करुन खोटा दावा पुन्हा केला जात आहे.
Tools Used 
Twitter Advanced Search
Google Reverse Image Search
Facebook Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular