महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या दाव्यात आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनासुद्धा लक्ष करण्यात आले आहे. नाना पटोले नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा असाच दावा करण्यात आला आहे. मी गोमांस आणि बीफ खातो असे उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचे हा दावा सांगतो.
शरद पवार आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत विशेष समुदायाने काँग्रेस, एनसीपी आणि उबाठाला जिंकवण्याची तयारी केली असे सांगत सध्या एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावे एक दावा व्हायरल झाला आहे. "लोकं उद्धव ठाकरेंना मुस्लिम हृदयसम्राट म्हणत असतील तर वावगं काय? हिंदू हृदयसम्राटचा मुलगा पण एका दुसऱ्या धर्माचा हृदयसम्राट असू शकतो." असे संजय राऊत यांनी म्हटल्याचे फेसबुकवरील हा दावा सांगतो.
लॉरेन्स बिष्णोई गँगच्या इशाऱ्यावर नुकतेच ज्यांची हत्या झाली त्या बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल बोलणाऱ्या आणि पोलिसांच्या गराड्यात असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सिद्दिकींच्या मारेकऱ्यांपैकी एक तो आहे असा दावा हा व्हिडीओ शेअर करणारे युजर्स करीत आहेत.