उर्दू भाषेलाही अभिजात दर्जा मिळावा अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया दाखवणारे एबीपी माझाचे न्यूजकार्ड सध्या व्हायरल होत आहे. दावा आहे की, मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे.
पाण्यात बोट बुडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, ही बोट गोवा येथे बुडाली. काही युजर या घटनेला भीषण अपघात असे म्हणत आहेत तर काहींनी बोट मालकाने क्षमतेपेक्षा जास्त माणसे भरल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे.
सप्टेंबर महिन्याची अखेर आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवातही अनेक फेक दाव्यांमुळे चर्चेत राहिली. मुंबईत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र, असा दावा करण्यात आला. हरियाणातील मेवात येथील काँग्रेसच्या निवडणूक रॅलीचा व्हिडिओ, असा दावा झाला. बेंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडातील मुख्य आरोपी अश्रफ आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
बेंगळुरू महालक्ष्मी हत्याकांडात जातीय अँगल असल्याचा दावा सर्वत्र पसरला आहे. अलीकडेच घडलेले बेंगळुरू महालक्ष्मी खून प्रकरण अनेक सोशल मीडिया युजर्सनी आणि अनेक वृत्तवाहिन्यांनी अशा प्रकारे शेअर केले होते की, महालक्ष्मीचा मुस्लिम प्रियकर अश्रफने तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते.