बेंगळुरू महालक्ष्मी हत्याकांडात जातीय अँगल असल्याचा दावा सर्वत्र पसरला आहे. अलीकडेच घडलेले बेंगळुरू महालक्ष्मी खून प्रकरण अनेक सोशल मीडिया युजर्सनी आणि अनेक वृत्तवाहिन्यांनी अशा प्रकारे शेअर केले होते की, महालक्ष्मीचा मुस्लिम प्रियकर अश्रफने तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते.
हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी 5 ऑक्टोबर 2024 रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, हरियाणात काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यानच्या बाईक चालवणाऱ्या लोकांच्या मिरवणुकीचा व्हिडिओ असे सांगत सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे.
मुंबईत मुस्लिमांच्या शक्तिप्रदर्शनाच्या दाव्यासह एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया यूजर्सच्या बरोबरीनेच काही अधिकृत माध्यमांनीही हा व्हिडीओ शेयर केला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यातही सोशल मीडियावरील फेक दाव्यांचा पाऊस सुरूच राहिला. तिरुपती मंदिराला तूप पुरवणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत, असा दावा करण्यात आला. टोल कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनाचा व्हिडिओ भारतातील आहे, असा दावा करण्यात आला. निपाणी येथे माश्याच्या पोटात गोळ्या ठेवणाऱ्या एक व्यक्तीला पोलिसांनी पकडले, असा दावा करण्यात आला. प्रचंड खड्डे पडलेल्या आणि त्यातून वाहने उडणाऱ्या रस्त्याचा व्हायरल व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा दावा करण्यात आला. गणपतीच्या पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहणार आहोत.
गणपती पंडालमध्ये हृदयविकाराच्या झटक्यातुन पुजारी चमत्कारिकरित्या बचावले असे सांगत अनेक सोशल मीडिया युजर एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यात कथितपणे गणपतीची पूजा केल्यानंतर एका पुजाऱ्याला हृदयविकाराचा झटका येत असल्याचे दाखवले जात आहे.