देशाच्या अनेक भागात सततच्या पावसामुळे पाणी तुंबणे, पूर येणे अशी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रातही सध्या पाऊस पडत आहे. दरम्यान, खड्डेमय रस्त्याने भरलेल्या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचे सांगत शेअर केले जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुर्ता पायजमा आणि इस्लामिक टोपी घातलेले काही लोक टोल प्लाझाची तोडफोड करताना आणि टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अप्रत्यक्षपणे भारतातील असल्याचे शेअर केले जात आहे.
तिरुपती लाडू वादाशी संबंध जोडणारा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, ज्यांच्या सॅम्पलमध्ये जनावरांची चरबी गोमांस आणि स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी असल्याची पुष्टी झाली आहे त्या तूप उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या उच्च व्यवस्थापनात सर्व मुस्लिम आहेत.
सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडाही सोशल मीडियावरील फेक व्हायरल पोस्टमुळे गाजला. रेल्वेवर विविध मार्गानी जिहाद करणाऱ्यांची मजल आता वंदे भारतच्या काचा फोडण्यापर्यंत गेली आहे, असा दावा करण्यात आला. गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी गणेशमूर्तीला अटक केली, असा दावा झाला. बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली, असा दावा करण्यात आला. हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असे सांगत राहुल गांधींच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.