Monday, December 23, 2024
Monday, December 23, 2024

LATEST ARTICLES

Weekly Wrap: विधानसभा निवडणुकीनंतरच्या प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची धामधूम संपली आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेक फेक दावे व्हायरल झाले. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ईव्हीएमविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली, असा दावा करण्यात आला. अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले, असा दावा करण्यात आला. यूपीच्या संभळमध्ये पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला, असा दावा झाला. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कारसेवकाच्या भूमिकेत एकत्र दिसत आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक आम्हाला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

फॅक्ट चेक: हा बाबरी मशीद विध्वंस दरम्यान एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो नाही, २००२ चा फोटो खोट्या दाव्यासह व्हायरल

महाराष्ट्र राज्यात महायुती (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी) मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेल्या गदारोळात, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचा असे सांगत एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Explainer: कन्नड मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण नेमके काय आहे? जाणून घेऊयात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. निकालानंतर पराभूत पक्ष आणि उमेदवारांपैकी बहुतेकांनी आपला निशाणा EVM वर साधला आहे. महाविकास आघाडीने तर याचा जोरदार धडाका सुरु केल्याचे दिसले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचा निकाल आणि आकडेवारीत घोळ झाल्याच्या आरोपावरून तापलेले राजकारण मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे. या आरोपांनी अवघा सोशल मीडिया व्यापून टाकला आहे. पती विरुद्ध पत्नी अशी लढत, महायुतीतून शिवसेना पक्षाच्या उमेदवार बनलेल्या पत्नीचा विजय, पराभूत पतीचे आरोप, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण तरीही विरोधी पक्षांसाठी EVM वर आरोप करण्यासाठी मिळालेली संधी अशा अनेक पैलूंनी गाजलेल्या या प्रकरणाची माहिती या एक्सप्लेनर मधून आम्ही घेणार आहोत.

फॅक्ट चेक: महाराष्ट्रात ईव्हीएम विरोधात प्रचंड आंदोलन? नाही, व्हायरल व्हिडिओमागील सत्य हे आहे

MVA (महा विकास आघाडी) नेत्यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीत त्यांच्या युतीच्या पराभवासाठी कथित EVM अनियमिततेचा उल्लेख केला आहे. याच अनुषंगाने मतदान यंत्राच्या वापराविरोधात प्रचंड विरोध दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

फॅक्ट चेक: अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून झाले हे आंदोलन? जाणून घ्या सत्य काय आहे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएमचा घोळ असा आरोप करीत अनेक मतदारसंघात लोक रस्त्यावर उतरले आहेत. अशातच अवधान गावात कुणालबाबा पाटील यांना शून्य मतदान मिळाले म्हणून आंदोलन झाले, असे सांगणारा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

गोरखपूरमध्ये सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा जुना व्हिडिओ संभळ हिंसाचाराशी जोडून व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये पोलिस जमावावर लाठीचार्ज करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ यूपीच्या संभळमध्ये घडलेला हिंसाचार म्हणून शेअर केला जात आहे.