"१९९२ च्या दंगलीतील सहभाग ही चूकच, माफ करा - उद्धव ठाकरे" अशा शीर्षकाच्या सोशल मीडियावरील पोस्टने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ माजविली. "बाळासाहेबांनी ज्या गोष्टीचा अभिमान बाळगला त्याच गोष्टीसाठी आज उ.बा.ठा. दिलगिरी व्यक्त करत आहे. मत मिळवण्यासाठी अजून किती खालची पातळी गाठणार?" तसेच "महाराष्ट्रातील हिंदूंच्या आयुष्यातील हाच काळा दिवस आहे." अशा कॅप्शनखाली प्रचंड व्हायरल झालेल्या पोस्टने तितकाच प्रचंड धुमाकूळ घातला. याच १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट आपण या एक्सप्लेनेरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरावरही वक्फ बोर्डने दावा केला आहे, असे हा दावा सांगतो. विशेष म्हणजे राजकीय दृष्टया आणि प्रचाराचा एक भाग बनविण्यासाठीचे नरेटिव्ह म्हणून हा दावा वापरला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
12 नोव्हेंबर 2024 रोजी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या एका कार्यक्रमात तिचा दीर्घकाळचा मित्र अनिश राजानीसोबत लग्नगाठ बांधली.
विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. यावेळची निवडणूक अनेक नरेटिव्हसवर गाजते आहे. याच क्रमाने शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा दावा केला जात आहे. आमचे सर्व उमेदवार धर्माने नसले तरी मनाने कट्टर मुसलमान आहेत, असे संजय राऊत म्हणाले. असे हा दावा सांगतो.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये योगी आदित्यनाथ यांच्या वेशात एक व्यक्ती जेसीबीवर उभा आहे. योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझरवर स्वार होऊन महाराष्ट्रात प्रचार केल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.