Saturday, May 18, 2024
Saturday, May 18, 2024

LATEST ARTICLES

मोदी पदवीधर नाहीत असे फडणवीस म्हणाले? पाहुयात सत्य काय आहे

"पंतप्रधान मोदी हे स्वतः पदवीधर नसल्याने त्यांचा फोटो प्रचारात न वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुर्कस्तानचा भूकंप: ढिगाऱ्याशेजारी बसलेल्या कुत्र्याचा 2018 मधील फोटो होतोय व्हायरल

तुर्कस्तानच्या नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर आपला मालक ढिगाऱ्याखाली अडकल्याने शेजारी बसलेल्या कुत्र्याचे चित्र असे सांगत एक भावनिक फोटो व्हायरल होतोय.

फ्लोरिडामध्ये इमारत कोसळल्याचा जुना व्हिडिओ तुर्कीचा भूकंप म्हणून केला जातोय शेयर

एका कोसळणाऱ्या इमारतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तुर्कस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाचा असल्याचा दावा केला जात आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर चर्चेत आलेला म्हादाई जलतंटा सामंजस्यातून सुटलाय? पाहुयात या प्रश्नाची नेमकी परिस्थिती

म्हादाईचे पाणी या विषयावर गोव्यातील विरोधी पक्षांनी गोवा मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादावर एकीकडे १३ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुसरीकडे म्हादाईच्या मुद्द्यावर अमित शहांच्या टिप्पणीवर गोव्याचा विरोध आणि स्थानिकांचा संताप वाढत चालला आहे. २८ जानेवारीला उत्तर कर्नाटकातील एका रॅलीत बोलताना शाह म्हणाले, " मित्रांनो, कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमधील असा जुना वाद मिटवून म्हादाई चे पाणी कर्नाटकला देऊन भारतीय जनता पक्षाने कर्नाटकातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे काम केले आहे." भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील दोन सरकारांमध्ये एकमत झाले आहे, असा शहा यांच्या विधानाचा अर्थ आहे.

Weekly Wrap: रणवीरने फेकला चाहत्याचा फोन, दलित मुलीस मारहाण, हिंदुत्व रॅलीस मुस्लिमांचा अडथळा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

गेल्या आठवडाभरात सोशल मीडियावर अनेक व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. अभिनेता रणवीर कपूर ने आपल्या चाहत्याचा फोन फेकून दिला असा एक दावा व्हायरल झाला. युपी मध्ये हिंदुत्ववादी गुंडांनी दलित मुलीला क्रूरपणे मारल्याचा दावा एका व्हायरल व्हिडीओ च्या माध्यमातून करण्यात आला. एका बनावट वेबसाईटची लिंक देऊन ती उद्यम नोंदणीसाठी अधिकृत वेबसाईट असल्याचा दावा करण्यात आला होता. तर मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चाला मुस्लिमांनी अडथळा आणल्याचा आरोप करणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या रॅलीला मुस्लिमांचा अडथळा? दिशाभूल करणारा आहे हा दावा

सोशल मीडियावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, मुस्लिमांनी महाराष्ट्रात हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, "मुंबईत झालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चा वर खुश होवून झोपू नका. जरा हा कोपरा बघा… तुम्हाला भविष्यातील आव्हानाची कल्पना येईल." या कॅप्शनखाली हा दावा करण्यात येत आहे.