Saturday, May 4, 2024
Saturday, May 4, 2024

LATEST ARTICLES

विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्या भेटीमागील सत्य काय आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,ज्यामध्ये ते 'मेक इन इंडिया'वर आपले मत मांडताना दिसत आहेत.व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्यात भारतात उद्योग उभारण्याबाबत झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत आहेत.

ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमध्ये परतले का?

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार,ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2018 मध्ये पक्षाने आयोजित केलेल्या 84 व्या अधिवेशनात हे विधान केले होते.विधान देताना,सिंधिया मोदी सरकारवर शेतकऱ्यांची दुर्दशा करत आहेत आणि उद्योगपतींना फायदा देत असल्याचा आरोप करताना पाहता येऊ शकतात.

T20 विश्वचषक 2022 मधील दिनेश कार्तिकच्या झंझावाती खेळीचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे

हा एक क्लिकबेट व्हिडिओ आहे,ज्याचे थंबनेल खोटी माहिती लिहून अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहेत की लोक व्हिडिओवर क्लिक करतात आणि त्याचे व्ह्यूज जास्तीत जास्त असू शकतात.दिनेश कार्तिकने 2022 च्या T20 विश्वचषकात अशी कोणतीही इनिंग खेळलेली नाही.भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे.

अमृता फडणवीस यांचे जुने छायाचित्र दिशाभूल करीत होत आहे व्हायरल

या चित्राचा तपास आम्ही घेतला.आम्ही सर्वप्रथम या चित्रातील पाणी साचलेल्या चित्रावर गूगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर केला.पुरस्थितीतले खरे चित्र आम्हाला Puneri Guide ह्या ट्विटर अकाउंटवर १४ ऑक्टोबर रोजी शेअर केल्याचे सापडले.पीआय न्यूजच्या वेबसाइटवरही आम्हाला ही छायाचित्रे सापडली.त्यानंतर आम्ही अमृता फडणवीस ह्यांच्या चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केले.अमृता फडणवीस यांनी आपले मूळ खरे चित्र त्यांच्या ट्विटर हॅन्डल वर १६ जुलै २०२१ रोजी पोस्ट केले होते.त्यांनी मुंबई मधील खड्डे असलेले रस्ते आणि पाणी साचलेले रस्ते यासोबत स्वतः फोटोशूट केले होते.त्यासंबंधी आम्हाला एबीपी माझा च्या वेबसाईट वर देखील एक बातमी सापडली.

मोदींनी काँग्रेसची स्तुती केली नाही,खोटा दावा करून व्हिडिओ होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये मोदी म्हणत आहेत की, 'तोडा आणि राज्य करा, ही आमची परंपरा आहे, जोडा आणि विकास करा, ही काँग्रेसची परंपरा आहे.हा व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच खरे बोलले असल्याचा दावा केला जात आहे.व्हिडीओ शेअर करत ट्विटरवर अनेक यूजर्सनी दावा केला की,पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच खरे बोलले आहेत.

व्हायरल झालेला हा फोटो काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा नाही

दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी,आम्ही व्हायरल प्रतिमेचा Google रिव्हर्स शोध केला.आम्हाला एप्रिल २०१६ मध्ये ग्रीनबारेज रिपोर्टर नावाच्या वेबसाइटने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला,ज्यामध्ये व्हायरल प्रतिमा उपस्थित आहे.या छायाचित्राचा स्रोत देण्यात आलेला नसला तरी,सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेले हे चित्र काही वर्षांपूर्वीपासून इंटरनेटवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.