शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांचा एक व्हिडिओ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला आहे, जर सत्तेत आल्यास त्यांच्या पक्षाचे सरकार अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमला क्लीन चिट देईल असे संजय राऊत म्हणाल्याचे त्यात दिसते.
माहीमच्या जागेवर महायुतीने मनसेला पाठींबा द्यावा ही मागणी आणि महायुतीतील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना दिलेली उमेदवारी यावरून सध्या पेच सुरु आहे. याच परिस्थितीत मूळ शिवसेनेतुन फुटून आलेले सदा सरवणकर यांच्या नावाने एक दावा व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या तळोजा सोसायटीत दिवाळीत दिवे लावण्यास विरोध झाला, मुस्लिम समुदायाने हिंदूंना दिवाळी साजरी करण्यापासून रोखले किंवा आणखी अनेक प्रकारचे दावे करणारे सोशल मीडिया पोस्ट प्रचंड व्हायरल झाले आहेत.