Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांचा नाही हा रक्ताने माखलेला व्हायरल फोटो
सोशल मीडियावर दोन छायाचित्रांचा कोलाज शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की, रक्ताने माखलेले छायाचित्र 26/11/2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हुतात्मा कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांचे आहे. पण हे खरे नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
व्हिएतनाममध्ये नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, चुकीचा दावा व्हायरल
व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. एका बातमीचे कात्रण शेअर करण्यात आले असून यात म्हटले आहे की, भारताचे सुपुत्र, महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महारांजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी व्हिएटतनाम सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. पण हे खरे नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
मित्रांच्या अनोख्या फंड्यामुळे बर्थडे बाॅयचा जीव गेला? हे आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य
काही मुले आपल्या मित्राचा वाढदिवस खूपच विचित्र पद्धतीने साजरा करताना दिसत आहेत. मित्रांच्या या कृत्यामुळे बर्थडे बाॅय बेशुद्ध होतो व त्याला मित्र दवाखान्यात नेण्यात येत असल्याचे दिसते. दावा करण्यात येत आहे की, मित्रांच्या अनोख्या फंड्यामुळे बर्थडे बाॅयचा जीव गेला, पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
मतदान केले नाही तर सरकारकडून मतदारांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार?
सोशल मीडियात बातमीचे कात्रण व्हायरल झाले्सून यात म्हटले आहे की, मतदान केले नाही तर सरकारकडून मतदारांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापले जाणार आहेत. या कात्रणात पुढे लिहिलं आहे की, ‘निवडणूक आयोगाने न्यायालयाकडून आधीच मंजुरी घेतली आहे. खाते नसेल तर मोबाईल रिचार्जमधून पैसे कापले जातील. पण हा दावा खोटा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.