Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक खोट्या दाव्यान्नी सुळसुळाट केला. हृदयविकारावरील एक रेमेडी वापरल्यास बायपास, अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी ची गरज नसल्याचा दावा करण्यात आला. रामनवमीच्या निमित्ताने बुर्ज खलिफावर श्री रामाची प्रतिमा झळकाविण्यात आली असा एक दावा झाला. आंबा खाऊन त्यावर कोल्डड्रिंक पिल्यास मृत्यू होतो तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावामुळे त्यांची सख्खी व चुलत भावंडे श्रीमंत झाली आहेत. असे दावे पाहायला मिळाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.
बुर्ज खलिफावर झळकले श्री राम?
रामनवमीच्या मुहूर्तावर बुर्ज खलिफावर प्रभू रामाची प्रतिमा झळकविण्यात आली असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला आहे.
आंबा खाऊन कोल्ड्रिंक पिल्यास होतो मृत्यू?
आंबा खाऊन शीतपेये अथवा कोल्डड्रिंक पिल्यास मृत्यू होतो असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उघडकीस आले.
डॉ. विकिनेश्वरी यांची ही रेमेडी नाही
मलाया विद्यापीठाच्या डॉ. विकिनेश्वरी यांनी दिलेली रेमेडी वापरल्यास अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास ची गरज नाही, असा दावा करण्यात आला. मात्र आमच्या तपासात हा दावाच खोटा असल्याचे निदर्शनास आले.
मोदींची भावंडे इतकी श्रीमंत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सख्ख्या आणि चुलत भावंडांना पंतप्रधानांच्या प्रभावामुळे मोठा आर्थिक लाभ झाला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा व काल्पनिक असल्याचे उघडकीस आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in