Authors
मागील आठवडाही अनेक खोट्या दाव्यान्नी गाजला. स्वामी विवेकानंद यांचे दुर्मिळ व्हिडीओ फुटेज सापडले असा एक दावा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर पूर्णपणे पाणीविरहित झाल्याचा दावा करण्यात आला. सरकार देशातील गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे. गाडीच्या टाकीत फुल्ल इंधन भरल्यास स्फोट होतो असे दावे करण्यात आले. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
हे विवेकानंदांचे फुटेज आहे?
स्वामी विवेकानंदांचे दुर्मिळ फुटेज असे सांगून एक दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.
मोफत शिलाई मशीनची योजनाच नाही
सरकार गोरगरीब महिलांना मोफत शिलाई मशीन देणार आहे. असे सांगणारा दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
केपटाऊन झाले पाणीविरहित?
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन हे शहर पूर्णपणे पाणीविरहित झाले आहे असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले आहे.
इंधन टाकी फुल केल्यास स्फोट होतो?
तापमान वाढत आहे त्यामुळे गाडीची इंधन टाकी फुल केल्यास स्फोट होऊ शकतो. असा दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in