Authors
चुकीची माहिती पसरविण्याच्या बाबतीत मागील आठवड्यातही सोशल मीडिया युजर्स आघाडीवर राहिले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते देण्यास नकार देऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना मारहाण करण्यात आली असा दावा करण्यात आला. निवडणुकीच्या दिवशी ईव्हीएम मशिन्स भाजप नेत्याच्या वाहनात सापडल्याने त्यांची मोडतोड करण्यात आली असा दावा झाला. ₹५०० च्या नोटा चलनातून बंद करण्यात येणार आहेत, ISIS चे टीशर्ट घातलेला समूह केरळ मधील आहे तसेच शिर्डी साई ट्रस्ट ने राम मंदिराला देणगी देण्यास नकार देऊन हज कमिटीला ३५ कोटींची देणगी दिली असे दावे करण्यात आले. या दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
₹५०० च्या नोटा चलनातून बंद होणार आहेत?
₹५०० च्या नोटा चलनातून बंद होणार आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
ISIS टी शर्ट मधील समूह नेमका कुठला?
केरळमध्ये ISIS चे एकसारखे टी-शर्ट घातलेल्या स्थानिक मुस्लिम पुरुषांचा समूह दिसत आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना झाली मारहाण?
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना एका गावात मते देण्यास नकार देऊन मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात आली. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
ईव्हीएम मशिन्स भाजप नेत्याच्या वाहनात सापडली नाहीत
कर्नाटकात भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्यानंतर नागरिकांनी त्यांची तोडफोड केली, असा दावा करण्यात आला. मात्र आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
साई ट्रस्ट ने हज कमिटीला देणगी दिली नाही
शिर्डी साई ट्रस्टने हज समितीला 35 कोटींची देणगी दिली राम मंदिराला एक रुपयाही दिला नाही, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in