Authors
Claim
राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे समर्थन त्यांचा मारेकरी करीत आहे.
Fact
व्हिडिओमध्ये दिसणारा माणूस लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले असले तरी, तो बाबा सिद्दीक हत्या प्रकरणातील आरोपी नाही. दिल्लीतील जिम मालकाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँगच्या इशाऱ्यावर नुकतेच ज्यांची हत्या झाली त्या बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल बोलणाऱ्या आणि पोलिसांच्या गराड्यात असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. सिद्दिकींच्या मारेकऱ्यांपैकी एक तो आहे असा दावा हा व्हिडीओ शेअर करणारे युजर्स करीत आहेत.
व्हायरल फुटेजमध्ये तो माणूस म्हणतोय, “…बाबा सिद्दिकी चांगला माणूस नव्हता. त्याच्याविरुद्ध मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मकोका अंतर्गत सामान्य व्यक्तीवर आरोप का लावले जातील?
तो पुढे म्हणतो, “असे म्हटले जाते की त्याचे दाऊदशी संबंध होते…” गुन्हेगारी प्रक्रियेशी संबंधित पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे तो देतो.
व्हेरीफाईड हँडलसह अनेक X युजर्स, बाबा सिद्दीकीचा शूटर त्याच्या कृतींचे समर्थन करीत असल्याचा दावा करत व्हायरल फुटेज शेअर करीत आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. न्यूजचेकरला मात्र असे आढळून आले की हा माणूस लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असला तरी तो बाबा सिद्दीक हत्या प्रकरणातील आरोपी नाही.
अशा पोस्ट इथे, इथे, इथे आणि इथे बघता येतील.
Fact Check/ Verification
Google वर “बाबा सिद्दीकी,” “नॉट गुड मॅन” आणि “शूटर” या कीवर्डच्या शोधामुळे 19 ऑक्टोबर 2024 रोजीचा पीटीआय रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एका शूटरने दावा केला होता की NCP नेता “नॉट गुड मॅन” होता आणि दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध होते.
योगेश उर्फ राजू (26) असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असून त्याला यूपीच्या मथुरा येथून अटक करण्यात आली. तो लॉरेन्स बिश्नोई-हाशिम बाबा टोळीशी संबंधित आहे. “गेल्या महिन्यात दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागात जिम मालक नादिर शाहच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर रोजीच्या बाबा सिद्दीकीच्या हत्येशी त्याचा संबंध नाही,” असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि मथुरा पोलिसांच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या चकमकीत जखमी झाल्यानंतर राजूला अटक करण्यात आली होती. जिल्हा रुग्णालयात नेले असता त्याने पत्रकारांशी संवाद साधला.
त्यानंतर आम्ही Google वर “योगेश,” “ॲरेस्टेड” आणि “जिम ओनर” हे कीवर्ड पाहिले ज्यामुळे आम्हाला 18 ऑक्टोबर 2024 रोजीच्या इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टकडे नेले. “जिम मालकाला गोळ्या घालून मारल्यानंतर फरार झालेला दुसरा शूटर दक्षिण दिल्लीतील GK-1 मथुरा महामार्गावर एका संक्षिप्त चकमकीनंतर अटकेत आला, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. योगेश उर्फ राजू हा लॉरेन्स बिश्नोई आणि हाशिम बाबा टोळीचा भाग असल्याची माहिती आहे.” असे आम्हाला वाचायला मिळाले.
रिपोर्टमध्ये तपशीलवार माहिती आहे, “अफगाणचा नागरिक नादिर शाह यांची 12 सप्टेंबरच्या रात्री GK-1 मधील जिमबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर सात आरोपी – आकाश यादव, नितालेश तिवारी, विशाल वर्मा, नवीन बालियान, मोहम्मद साजिद, पंकज कुमार आणि सचिन यादव याना अटक करण्यात आली, गोळीबार करणारे मधुर उर्फ मोटा अरमान आणि राजू तेव्हापासून फरार होते.
योगेशचे बाबा सिद्दिकीवरील व्हिडीओ स्टेटमेंट व्हायरल झाल्यानंतर मथुराचे एसएसपी शैलेश पांडे यांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले, अशी माहिती एएनआयने दिली आहे. “पोलीस आणि दिल्ली स्पेशल सेल टीमच्या संयुक्त कारवाईत, योगेश नावाचा शार्पशूटर, ज्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे म्हटले जाते, तो चकमकीत जखमी झाला. तो दिल्लीतील एका खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड होता,” असे एसएसपी पांडे यांनी अहवालात नमूद केले आहे.
सिद्दीकी यांची मुंबईतील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
पीटीआयच्या दुसऱ्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की अधिकाऱ्यांनी “योगेशचा बाबा सिद्दीकीच्या हत्येशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले”
17 ऑक्टोबर 2024 रोजीच्या एका X पोस्टमध्ये, दिल्ली पोलिसांनी योगेशच्या अटकेची तपशीलवार माहिती दिली, “ग्रेटर कैलाश भागातील जिम मालकाच्या हत्येचा मुख्य शूटर” जेरबंद करण्यात आला. आरोपीकडून एक पिस्तूल, सात जिवंत काडतुसे आणि चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.”
बाबा सिद्दीक हत्या प्रकरणात अटक
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी 10 जणांना अटक करण्यात आल्याचे अलीकडील रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नवी मुंबईतील भंगार विक्रेता भगवंत ओमसिंग याला या प्रकरणात ताजी अटक करण्यात आली आहे.
गोळीबार करणाऱ्यांना बंदुक आणि रसद पुरवल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली. नितीन गौतम सप्रे, संभाजी किसन पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी आणि राम फुलचंद कनौजिया अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी यापूर्वी गुरमेल बलजित सिंग, धर्मराज कश्यप, हरीश कुमार निसाद आणि प्रवीण लोणकर यांना या हत्येप्रकरणी अटक केली होती. सिंग, कश्यप आणि वाँटेड आरोपी शिवकुमार गौतम यांनी गोळीबार केला. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप यांच्या चौकशीचा हवाला देत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गौतमला “मुख्य शुटर” म्हणून नियुक्त करण्यात आले होते कारण त्याला बंदूक कशी चालवायची हे माहित होते.
Conclusion
व्हायरल व्हिडिओमध्ये बाबा सिद्दीकीचा शूटर मीडियाशी संवाद साधताना दिसत नाही. योगेश नावाच्या व्यक्तीचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असला तरी तो राष्ट्रवादीच्या नेत्याच्या खून प्रकरणातील आरोपी नाही. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Sources
Report By PTI, Dated October 19, 2024
Report By Indian Express, Dated October 18, 2024
X Post By Delhi Police, Dated October 1, 2024
Report By PTI, Dated October 21, 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा