Authors
Claim
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर गांधी कुटुंबाचा व्हिएतनाममधील फोटो.
Fact
व्हायरल झालेला फोटो दिल्लीतील एका रेस्टॉरंटचा आहे. हा फोटो मनमोहन सिंग यांच्या मृत्युपूर्वीचा आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला. अंत्यसंस्कारासाठी वेगळे स्मारक न दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. त्याच वेळी, भाजपने काँग्रेसवर माजी पंतप्रधानांच्या मृत्यूचे “राजकारण” करण्याचा आरोप केला आहे.
मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण देश शोक करत असताना, राहुल गांधी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी व्हिएतनामला गेले होते, असा आरोप भाजपने केला. या दाव्यांमध्ये, सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसत आहेत.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये (संग्रहित) असे लिहिले आहे, “भारत सात दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळत असताना त्यांच्या मालकाचे कुटुंब डॉ. मनमोहन सिंग यांना व्हिएतनाम मध्ये अंतिम श्रद्धांजली वाहत आहे.” अशा इतर पोस्ट येथे, येथे आणि येथे पहा.
Fact Check/ Verification
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने व्हायरल फोटो शोधला. दरम्यान, आम्हाला हा फोटो २३ डिसेंबर २०२४ रोजी @jagranenglishnews ने केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिसला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर २०२४ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात वृध्दापकाळाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे निधन झाले हे ज्ञात आहे. हा फोटो २६ डिसेंबर २०२४ पूर्वीच इंटरनेटवर असल्याने, हे स्पष्ट होते की हा फोटो मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतरचा नाही. jagranenglishnews ने केलेल्या इंस्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये, दिल्लीतील क्वालिटी रेस्टॉरंट असे वर्णन केले आहे.
अधिक तपास करण्यासाठी, आम्ही “राहुल गांधी” आणि “क्वालिटी रेस्टॉरंट” सारखे कीवर्ड गुगलवर शोधले. या काळात, आम्हाला या फोटोसह प्रकाशित झालेले अनेक मीडिया रिपोर्ट्स आढळले, ज्यामध्ये ते कॅनॉट प्लेसमधील क्वालिटी रेस्टॉरंटचे असल्याचे म्हटले होते. इंडिया टुडेने प्रकाशित केलेल्या बातमीत म्हटले आहे की हा फोटो २२ डिसेंबर २०२४ चा आहे, ज्या दरम्यान गांधी कुटुंबाने कॅनॉट प्लेसमधील प्रतिष्ठित क्वालिटी रेस्टॉरंटला भेट दिली होती. यात प्रियंका गांधींच्या जेवणाच्या आवडी आणि यावेळी त्यांनी वाजवण्यास सांगितलेल्या गाण्यांबद्दलही चर्चा केली आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या बातमीतही हे चित्र दिसते.
तपासात आम्हाला आढळले की २२ डिसेंबर २०२४ रोजी राहुल गांधींनीही हा फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, “क्वालिटी रेस्टॉरंटमध्ये फॅमिली लंच. जर तुम्ही गेलात तर छोले भटुरे नक्की खा. (अनुवादित)”
Conclusion
तपासातून असा निष्कर्ष निघतो की व्हायरल झालेला फोटो मनमोहन सिंग यांच्या मृत्यूपूर्वीचा आहे आणि तो व्हिएतनामचा नाही.
Result: False
Sources
Instagram Post By @jagranenglishnews, Dated December 23, 2024
Report By India Today, Dated December 22, 2024
Instagram Post By Rahul Gandhi, Dated December 22, 2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी आणि इंग्रजीनेही केले असून ते येथे आणि येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा