Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
सोशल मीडियामध्ये कोरोना जागतिक घोटाळा असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, इटली जगातील पहिला असा देश आहे की जिथे कोविड-19 मृत शरीराचे पोस्टमार्टम केले गेले आहे. व्यापक तपासणीनंतर कोविड-19 हा कोरोना व्हायरसच्या रुपात नसल्याचे सत्य समोर आहे. हा एक खूप मोठा जागतिक घोटाळा आहे. खरे तर लोक एम्प्लीफाईड ग्लोबल5जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुळे मरत आहेत.
पोस्टमधील दाव्याची आम्ही पडताळणी करण्याचे ठरविले यातील पहिला दावा असा आहे की, कोरोना हा व्हायरस नसून बॅक्टेरिया आहे. त्यामुळे नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या साचतात परिमाणी रुग्णाचा मृत्यू होतो. एका रिसर्च रिपोर्ट नुसारकोरोना व्हायरस मध्ये रेस्पिरेटरी फैल्युर हे मृत्यूचे प्रमुख कारण मानले जात आहे. पण हे मुख्य कारण नाही.
दुसरा दावा
जागतिक आरोग्य संगघटना कोरोना ने मृत पावलेल्या प्रेतांची ओॅटोप्सी करण्याची परवानगी देत नाही कारण हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया आहे माहित पडू नये.
या दाव्यात तथ्य नाही. कारण जागतिक आरोग्य संघटनेने असा शव परिक्षण न करण्याचा कोणताही ही कायदा केलेला नाही. मात्र कोरोनाने मृत झालेल्या शवांबाबत एक गाईडलाईन जारी केली आहे. शिवाय संघटनेने कोरोना हा एक बॅक्टेरिया नसून व्हायरस असल्याचे म्हटले आहे.
तिसरा दावा
कोरोना व्हायरसचा इलाज अॅंटिबायोटिक्स, अॅंटी इन्फेमेटरी किंवाअॅस्प्रिन ने केला जाऊ शकतो.
हा दावा देखील खोटा आहे डब्ल्यूएचओ ने कोरोना एक व्हायरस आहे आणि अॅंटिबायोटिक्स ने याचा इलाज होऊ शकत नाही.
चौथा दावा
लोक एम्प्लीफाईड ग्लोबल5जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मुळे मरत आहेत असाही दावा या लेखात करण्यात आला आहे.
आम्हाला एप्रिल 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला एक रिपोर्ट आढळून आला. या रिपोर्टनुसार संयुक्त राष्ट्राच्या एजेंसी ने माहिती व संचार निगम ला सांगितले आहे की, हायस्पीड ब्राॅड ब्रॅंड 5जी टेकनिक जबाबदार नाही.
यावरुन हेच सिद्ध होते की इटली मध्ये कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या प्रेतांच्या पोस्टमार्टम संबंधित व्हायरल पोस्ट खोटी आहे.
Economics Times- https://telecom.economictimes.indiatimes.com/news/theory-of-5g-spreading-covid-19-a-hoax-that-has-no-technical-basis-un-ict-agency/75318703
WHO- https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/advice-for-public/myth-busters#virus