Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeCoronavirusमहाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन जाहिर केलेला नाही, जुना व्हिडिओ व्हायरल 

महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन जाहिर केलेला नाही, जुना व्हिडिओ व्हायरल 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 15 जूनपासून 30 सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊन जाहिर केला आहे.” 

सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रात 15 जूनपासून 30 सप्टेंबर पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहेत या पोस्टमध्ये सीएएन न्यूज 18 या वृत्तवाहिनीच्या बातमीच्या एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

पडताळणी-

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरंच लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे का याबाबात आम्ही पडताळणी सुरु केली असता फेसबुकवर याच दाव्याची एक पोस्ट आढळून आली. फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि पुण्यात फक्त गरजेचीच दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असाही दावा करण्यात आला आहे. 

संग्रहित

याशिवाय आम्हाला आणखी एक ट्विट आढळले यात व्हायरल पोस्टविषयी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

संग्रहित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्या लाॅकडाऊन वाढविण्याचा निर्णयाच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. माय महानगर या वेबसाईटवर 10 जून रोजीची एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, सध्या 30 जूनपर्यंत लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात येईल असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी इतर मंत्र्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दिले आहेत. ‘जर शिथिल केलेले नियम किंवा काढलेला लॉकडाऊन जीवघेणा ठरत आहे असं दिसलं, तर नाईलाजाने लॉकडाऊन पुन्हा वाढवावा लागेल’, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केली. 

मात्र या बातमीत कुठेही 15 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आल्याचा उल्लेख नाही त्यामुळे आम्ही व्हायरल पोस्टमधील सीएनएन न्यूज 18 च्या बातमीचा व्हिडिओ बारकाईने पाहिला असता हा व्हिडिओ 20 मार्च रोजीचा म्हणजेच तीन महिन्यापूर्वी देशभरात लाॅकडाऊन घोषित होण्यापूर्वीचा असल्याचे आढळून आले. यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व पुणे येथील सर्व अनावश्यक दुकाने व कार्यालये सक्तीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, बस, गाड्या आणि बँका कार्यरत राहतील. 

अधिक शोध घेतला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन वाढविण्यात आला नसल्याचे स्पष्टिकरण दिल्याची माहिती मिळाली. 

यावरुन हेच स्पष्ट होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊन वाढविलेला नाही. सोशल मीडियात जुन्या बातमीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे. 

Source

Facebook, Twitter, Youtube

Result– Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular