पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. टिव्ही9 मराठी या वृत्तवाहिनीच्या बातमीची 30 सेकंदाची क्लिप व्हाटसअप्पवर शेअर करण्यात येत आहे.यात म्हटले आहे की, पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून 15 दिवस लाॅकडाऊन करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पुणे पिंपरीत मध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.

Fact Check/Verification
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याच्या बातम्या माध्यमांत प्रकाशित होत आहेत. अशातच जिल्ह्यात सोमवारपासून 15 दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात येत असल्याची टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या बातमीच्या व्हायरल क्लिपचे सत्य काय आहे याची आम्ही पडताळणी सुरु केली असता आम्हाला 27 नोव्हेंबर 2020 रोजीची सकाळची बातमी आढळून आली यात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात एका दिवसात कोरोनाचे 966 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तसेच कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या देखील कमी आहे. मात्र या बातमीत कुठेही सोमवारपासून जिल्ह्यात लाॅकडाऊन केला जाणार असल्याचा उल्लेख नाही.

याशिवाय अनेक वर्तमानपत्रांनी कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याचा बातम्या दिल्या आहेत मात्र यात कुठेही पुन्हा लाॅकडाऊन केला जाणार असल्याचा उल्लेख नाही.

याशिवाय आम्हाला टिव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर देखील कोरोना रुग्णसंख्यावाढीची बातमी आढळून आली. यात पुण्यात रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे म्हटले आहे पण लाॅकडाऊनचा उल्लेख नाही.

व्हायरल बातमी नेमकी कधीची आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता टिव्ही 9 मराठीची 10 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचा 3 मिनटे 2 सेंकदांचा व्हिडिओ आढळून आला. याच व्हिडिओतील सुरवातीचा 30 सेंकदांचा भाग सध्या व्हायरल होत असल्याचे स्पष्ट झाले.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, पुण्यात 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून लाॅकडाऊन लागू केला जाणार नाही, टिव्ही 9 मराठीची चार महिन्यांपूर्वीची बातमी चुकीच्या दाव्याने व्हायरल झाली आहे.
Result- Misleading
Our Sources
TV 9 Marathi- https://www.youtube.com/watch?v=0rpSNK1_DH0
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.