Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे दोन वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिल्या फोटोत प्रियांका गांधींनी लाल साडी घातली आहे आणि हातात तलवारही धरली आहे, तिच्या कपाळावर मोठा टिळा आहे. सोशल मीडियावर, लोक विनोदी कमेंट्स करत आहेत. ज्यात म्हणत आहेत की, ‘पिंकी जी ज्या वेगाने मंदिर-मंदिरात फिरत आहेत निवडणुक जवळ येईपर्यंत राधे मां तर बनणार नाही ना.तर दुसऱ्या व्हायरल झालेल्या फोटो प्रियांका गांधी झाडू मारताना दिसत आहेत आणि एक छायाचित्रकार त्यांचा फोटो घेताना जमिनीवर पडलेला दिसत आहे.
व्हायरल ट्विटचे व्हर्जन इथे पाहू शकता.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत, अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्ष लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी आपापल्या युक्त्या आजमावत आहेत. दरम्यान, 8 ऑक्टोबर रोजी प्रियांका गांधी वाड्रा लखनौच्या इंदिरा गांधी नगरमधील दलित वसाहतीतील लवकुश नगरमध्ये पोहोचल्या. प्रियंकाने लवकुश नगरमध्ये असलेल्या वाल्मीकी मंदिरात झाडूही मारला. 8 ऑक्टोबर रोजी आज तक ने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, झाडून घेताना प्रियंका गांधी म्हणाल्या की झाडणे हे स्वाभिमान आणि साधेपणाचे प्रतीक आहे. देशातील झाडू मारण्कयाचे काम करोडो महिला, भाऊ आणि बहिणी करतात. यावेळी त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही लक्ष्य केले. याशिवाय प्रियांका गांधींनी मंदिरांना भेटी दिल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीच्या तिकोनिया भागात 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात शेतकरी आंदोलकांसह एकूण 8 लोक मारले गेले. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी प्रियांका गांधी लखीमपूर खेरीला जात होत्या, सीतापूरमध्येच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि तिथे तिला पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले, जिथे त्यांचा झाडू मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना टोमणे मारले होते. हिंसाचाराशी संबंधित संपूर्ण बातमी येथे वाचता येईल. यापूर्वी, प्रियांका गांधींची सफाईची एक संपादित क्लिप व्हायरल झाली होती, ज्याची आमच्या टीमने पडताळणी केली आहे. ज्याची लिंक तुम्ही इथे पाहू शकता.
वरील दोन व्हायरल फोटो इतर अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी देखील शेअर केले आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी प्रियांका गांधी खरोखरच मंदिर-मंदिरात जाऊन दर्शनकरत आहेत का, दलितांमध्ये झाडून काढताना प्रियांकाने हे फोटोशूट केले आहे का? व्हायरल होणाऱ्या पहिल्या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही काही कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला आज तक ने 19 मार्च 2019 रोजी प्रकाशित केलेली एक बातमी मिळाली. यानुसार, प्रियांका गांधी त्यावेळी उत्तर प्रदेशच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांनी मिर्झापूरच्या विंध्यचल मंदिराला भेट दिली आणि मंदिराच्या अभ्यागत पुस्तकात जय माता दी लिहिले.
पडताळणीदरम्यान आम्हाला 19 मे 2019 रोजी Deccanherald मध्ये प्रकाशित झालेला एक लेख आढळून आला. यात, विंध्यचल मंदिरात दर्शनादरम्यानचा प्रियंका गांधी यांचा फोटो देखील प्रकाशित केला आहे, जो वरील दाव्यासह एडिटकरुन आणि व्हायरल केला जात आहे.
पडताळणीत प्राप्त झालेल्या मीडियो रिपोर्ट्स नुसार प्रियांका गांधी यांचा टिळा लावलेला आणि त्रिशूल घेतलेला फोटो एडिटेड आहे.
त्याचवेळी दुसऱ्या व्हायरल फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही ट्विटर अॅडव्हान्स सर्चची मदत घेतली. या दरम्यान आम्हाला एक ट्विट मिळाले. मिळालेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर करण्यात आला आहे. पोस्टमध्ये एक फोटोग्राफर पीएम मोदींचा फोटो घेत जमिनीवर पडलेला दिसत आहे.
विशेष म्हणजे 26 सप्टेंबर रोजी अमेरिकेतून भारतात परतलेले पंतप्रधान मोदी अचानक नवीन संसदेच्या इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तेथे सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. त्या काळात सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला होता.. पीएम मोदींचे फोटो फोटोशॉप्ड होता. न्यूजचेकरने याची पडताळणी केली होती, जी तुम्ही येथे वाचू शकता. आता पुन्हा एकदा त्याच छायाचित्रकारासोबत प्रियांका गांधी यांचा फोटो व्हायरल होत आहे, जो एडिटेड आहे.
आमच्या पडताळणीत आढळलेल्या तथ्यांनुसार, प्रियंका गांधींच्या फोटोंबाबत केलेला दावा खोटा आहे. एडिटिंग सॉफ्टवेअरद्वारे एडिट करून व्हायरल फोटो तयार करण्यात आले आहेत.
Media Reports
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा
Prasad S Prabhu
May 26, 2025
Kushel Madhusoodan
May 22, 2025
Prasad S Prabhu
April 9, 2025