Tuesday, July 23, 2024
Tuesday, July 23, 2024

HomeFact CheckViralहिमा दासने २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकले? भ्रामक दावा व्हायरल

हिमा दासने २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकले? भ्रामक दावा व्हायरल

Claim

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केला जातोय की, हिमा दा यांनी २०२२ च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 

Fact

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही यु ट्यूबवर कीवर्ड टाकून शोधले. तेव्हा आम्हांला १२ ऑगस्ट २०२१ रोजी अपलोड केलेला वर्ल्ड ॲथलेटिक्स या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर व्हायरल व्हिडिओ मिळाला. त्या व्हिडिओच्या शिर्षकात ‘Women’s 400m Final – World Athletics U20 Championships Tampere 2018’ असं लिहिले होते.

त्याचबरोबर आम्हांला १३ जुलै २०१८ रोजी न्यूज हावर इंडियाने यु ट्यूबवर अपलोड केलेला हाच व्हायरल व्हिडिओ मिळाला. ‘Hima Das Historic 400m Run of India Wins Gold in World Championships’ असं त्या व्हिडिओचे शीर्षक होते. 

जुलै २०१८ मध्ये फिनलँडच्या टेंपेरमध्ये ४०० मीटर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हिमा दासने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली होती. ३० जुलै २०२२ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, २ ऑगस्ट २०२२ रोजी अलेक्झांडर स्टेडियममध्ये ट्रॅक आणि फिल्डच्या स्पर्धा सुरू होणार आहे. हिमा दास हिने २०० मीटर स्पर्धेत भाग घेतला असून ती स्पर्धा ४ ऑगस्टला आहे. याचे उपांत्यपूर्व आणि अंतिम सामने ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. 

Result : False

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular