Authors
Claim
इन्फोसिसच्या चेअरपर्सन सुधा मूर्ती यांची जीवनकथा असल्याचा दावा करणारा एक व्हायरल फॉरवर्ड मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.असा दावा करण्यात आला आहे की श्रीमती उषा भट्टाचार्य नावाच्या एका अनोळखी व्यक्तीने मुंबई ते बेंगळूर प्रवास करताना चित्रा नावाच्या घरातून पळून गेलेल्या मुलीच्या रेल्वे तिकिटाचे पैसे दिले आणि त्या मुलीला एका एनजीओकडे सोपविले.जेणेकरून तिची योग्य काळजी घेतली जाईल.पुढे असे म्हटले आहे की ही लहान मुलगी इन्फोसिसच्या चेअरपर्सन सुधा मूर्ती अर्थात इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी बनली आहे.
Fact
गुगलवर व्हायरल स्टोरीचा कीवर्ड शोध घेतल्यावर,न्यूजचेकरला आढळले की तीच स्टोरी टाइम्स ऑफ इंडिया प्रकाशन असलेल्या द स्पीकिंग ट्री या लोकप्रिय ब्लॉगवर पोस्ट केली गेली आहे.त्यांच्या वेबसाइटनुसार,यात निरोगीपणा आणि अध्यात्म यासह विविध विषयांचा समावेश आहे,तसेच आरोग्य, पैसा आणि नातेसंबंध यासारख्या पैलूंचा समावेश आहे ज्यामुळे वेबसाइट देशभरातील वाचकांच्या विस्तृत श्रेणीला आकर्षित करते.
17 डिसेंबर 2016 रोजी केलेल्या ब्लॉग एंट्रीनुसार,कथा सुधा मूर्ती यांनी लिहिली होती,“अध्यक्षा, इन्फोसिस फाऊंडेशन सामान्य लोकांच्या जीवनातील मनोरंजक कथा गोळा करण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात.‘बॉम्बे टू बंगलोर’ या त्यांच्या नवीनतम संग्रहातून खालील माहिती घेतली आहे.”ही कथा स्वतःबद्दल लिहिलेली नाही.कथा लेखक दुसऱ्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत आहेत.लेखिका अर्थात सुद्धा मूर्ती त्या पळून गेलेल्या मुलीबद्दल लिहिताना दिसतात.कथेतील चित्रा नावाची छोटी मुलगी पुढे मोठी होऊन सुद्धा मूर्ती झाली असे ब्लॉगमध्ये कुठेही लिहिलेले नाही.व्हायरल फॉरवर्डवर ब्लॉगमध्ये प्रकाशित झालेल्या कथेचा शेवट थोडा वेगळा आहे,ज्यामुळे न्यूजचेकरला अधिक चौकशी करण्यास भाग पाडले.
पुढील तपासानंतर,न्यूजचेकरला तीच कथा 28 ऑगस्ट 2012 रोजी दुसर्या ब्लॉगवर अपलोड केलेली आढळली.
ब्लॉग एंट्रीमध्ये असे लिहिले आहे की”इन्फोसिस फाऊंडेशनच्या लेखिका आणि अध्यक्षा सुधा मूर्ती,सामान्य लोकांच्या जीवनातील आकर्षक किस्से गोळा करण्याच्या आणि त्यांना मूळ दंतकथा आणि उपाख्यानांमध्ये विणण्याच्या त्यांच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत.”
त्यात पुढे असे म्हटले आहे की “त्यांच्या नवीनतम कथा संग्रह ‘द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क’ मध्ये आकर्षक पात्रे आहेत.ज्यातील प्रत्येकाने लेखकावर अमिट छाप पाडली आहे.या संग्रहातील सर्वात हृदयस्पर्शी कथांपैकी एक असलेल्या ‘बॉम्बे टू बंगलोर’ या कथेतील एक भाग येथे घालण्यात आलेला आहे.
ब्लॉग एंट्री ‘द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क’या पुस्तकातील कथेच्या दीर्घ आवृत्तीचे पुनर्लेखन असून शेवट स्पीकिंग ट्री वेबसाइट प्रमाणेच आहे.
Newschecker ला Goodreads वर शीर्षकात लघुकथा आणि इतर कथांचे पुनरावलोकन देखील आढळले.वेबसाइटनुसार,लघुकथा ‘बॉम्बे टू बंगलोर’ नावाच्या इतर कथांसह एक स्वतंत्र कथा म्हणून प्रकाशित करण्यात आली होती.
“गेल्या काही वर्षांमध्ये,सुधा मूर्ती अशा काही आकर्षक लोकांच्या भेटीस आल्या आहेत ज्यांचे जीवन मनोरंजक कथा बनते आणि त्यांच्या जीवनातून शिकण्यासारखे अधिक आहे.”असे पुनरावलोकन सांगते.हे पुस्तक आत्मचरित्रात्मक नसून इतर लोकांचे अनुभव घेऊन लिहिण्यात आले आहे.
न्यूजचेकरने पुस्तकातील प्रश्नाचा पुढे अभ्यास केला,‘द डे आय स्टॉप्ड ड्रिंकिंग मिल्क’.पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे लिहिले आहे की,“मी अनेक लोकांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल का लिहित आहे ज्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल मला सांगितले आहे.असे करणे तत्वात बसते का?तथापि,मी लिहिलेल्या बहुतेक लोकांनी मला त्यांची नावे बदलण्याची आणि त्यांच्या समस्या केस स्टडी म्हणून वापरण्याची विनंती केली आहे…”
प्रस्तावना हे स्पष्ट करते की सुधा मूर्ती यांनी स्वतःच्या जीवनकथे बद्दल नव्हे तर इतरांना आलेल्या वास्तविक जीवनातील अनुभवांबद्दल लिहिले आहे.
न्यूजचेकरला लोकप्रिय यूट्यूब चॅनेल बीयरबिसेप्सवर एक व्हिडिओ देखील सापडला ज्यामध्ये सुधा मूर्ती त्यांच्या बालपणातील आठवणी आणि किस्से सांगत आहेत.व्हिडिओमध्ये,सुधा मूर्ती आपले पालक आणि शिक्षकांनी नेहमीच दिलेल्या पाठींब्याबद्दल त्यांचे आभार मानताना दिसतात.कर्नाटकमध्येच आपण कशा लहानाच्या मोठ्या झालो हे देखील त्यांनी सांगितलेले दिसते.कर्नाटकातील आपण घेतलेल्या अभियांत्रिकी शिक्षणाचे देखील वर्णन त्यांनी केले आहे, जिथे त्या आपल्या बॅचमधील एकमेव महिला किंवा तरुणी होत्या.त्यांनी आपल्या मुंबईतील किंवा दिल्लीला स्थलांतरित होण्याचा उल्लेख केलेला नाही.यावरून व्हायरल पोस्ट मधील कथा त्यांची किंवा आत्मचरित्रात्मक नाही हे सिद्ध होते.
सुधा मूर्ती यांच्याशी संपर्क साधण्याचाही आम्ही प्रयत्न केला. आम्हाला प्रतिसाद मिळाल्यावर लेख अपडेट केला जाईल.
Result:False
तुम्हाला हे आवडले असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर इथे क्लिक करा.
तुम्हाला एकाद्या क्लेमची फॅक्ट-तपासणी करायची असेल,फीडबॅक द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल,तर 9999499044 वर व्हॉट्सअप करा किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.