या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. राखी सांवतचा पाकिस्तानी झेंडा हातात घेतलेला फोटो तिचे पाकिस्तान प्रेम किती आहे या दाव्याने व्हायरल झाला तर कंगना रानौतने कपिल शर्माच्या शोवर बहिष्कार घातल्याचे ट्विट व्हायरल झाले. हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

राखी सांवतने पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन फोटोशूट केल्याचा दावा
राखी पाकिस्तानी ध्वज फडकवताना दिसत आहे तर दुस-या एका फोटोत तो ध्वज तिने आपल्या शरीराला लपेटून घेतला आहे. दावा करण्यात येत आहे की जिला तुम्ही कट्टर देशभक्त समजता तिने पाकिस्तानी ध्वजासोबत फोटो काढले आहेत. पडताळणीत तो एका चित्रपटातील सीन होता. त्याच सीनचा फोटो आता चुकीच्या दाव्याने व्हायरल सत्य समोर आले संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

कोलंबियात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या बसेस धावत आहेत
एका बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेत आज देखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला जातो. अमेरिका त्यांना आदर्श मानते. पडताळणीत हा फोटो एडिटेड असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

नांदेड, पुणे, नाशिक जिल्हाधिका-यांनी कोरोनासंदर्भात संदेश दिल्याचा दावा
जिल्हाधिका-यांच्या नावाने मॅसेज व्हायरल झाला आहे. यात कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. वृत्तपत्रे बंद करा, चिकन मटन खाणे बंद करा अशा अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. पडताळणीत हा मॅसेज खोटा असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा

पुद्दुचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा कोरोनावरील घरगुती उपाय WHO ने स्वीकारल्याचा दावा
पुद्दुचेरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याचा कोरोनावरील घरगुती उपाय WHO ने स्वीकारला असल्याच्या दाव्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. जागतिक आरोग्य संघटनेने अनेक अफवांचे खंडन केलेले आहे. यापैकीच एक मिरपुडाच्या उपायाबद्दल त्यांनी म्हटले आहे की सूप किंवा जेवणात मिरपूड घातल्याने कोरोना नष्ट होऊ शकत नाही. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

कंगणा रानौतने कपिल शर्माच्या शोचा बहिष्कार केला असल्याचा दावा
कंगना रानौतने कपिल शर्माच्या शोचा बहिष्कार केल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये कंगनाच्या ट्विटचा स्क्रीनशाॅट शेअर करण्यात आला आहे. पडताळणी हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. सोशल मीडियात फेक ट्विट व्हायरल झाले आहे. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.