Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : आंबा खालल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका ते 'द कपिल...

Weekly Wrap : आंबा खालल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका ते ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार नाही, आठवड्यातील या आहेत टॉप फेक न्यूज

आपण सोशल मीडियावर अनेक गोष्टी पाहतो. त्याविषयी लोकं अनेक प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यातील बहुतांश दावे हे भ्रामक असतात. आमच्या टीमने या आठवड्यातील अशाच काही फेक न्यूजच्या दाव्याची सत्यता तपासली आहे. 

आंबा खालल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका, फेक संदेश व्हायरल होतोय

सोशल मीडियावर एक संदेश प्रचंड व्हायरल झाला. त्यात असा दावा केला होता की, आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक पिऊ नका. अन्यथा तुमचा मृत्यू होऊ शकतो. याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यावर त्यांनी सांगितले की, या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

युपी पोलिसांनी ठाण्यात एका तरुणाला मारल्याचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत होतोय व्हायरल, जाणून घ्या सत्य काय आहे ? 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात दावा केलाय की युपी पोलिसांनी ठाण्यात एका तरुणाला बेदम मारले. त्या व्हायरल व्हिडिओत पोलिसांच्या वर्दीत असणारे काही व्यक्ती त्याला बेदम मारतांना दिसत आहे. पण तो व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा एका मोबाईल चोरीच्या घटनेचा आहे. याचे फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

टोलवर मिळणाऱ्या त्या पावतीचा मेसेज फेक आहे, जाणून घ्या सत्य काय आहे ? 

सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीचे अतिरिक्त फायदे आहेत. याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) यांच्या एका अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा दावा भ्रामक आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार नाही, चुकीचा दावा होतोय व्हायरल

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर होत आहे. त्यात दावा केलाय की, कपिल शर्मा यांचा कार्यक्रम बंद होणार आहे. बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर या विषयी पोस्ट केल्या होत्या. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही कपिल शर्मा यांचे मॅनेजर अजय आणि सोनी टीव्हीचे मॅनेजर कृपा नायक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावरील हे दावे चुकीचे आहेत. याचे फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular