Authors
Claim
असे औषध विकसित केले आहे ज्याचा फक्त एक डोस घेतल्यास मधुमेह बरा होईल.
Fact
फेसबुकवर व्हायरल होत असलेला हा दावा खोटा आहे.
फेसबुकवरील ‘भारत से चिकित्सा समाचार’ पेजवरून एक दावा व्हायरल होत आहे की एका भारतीय डॉक्टरने एका डोसमध्ये रक्तातील साखर सामान्य करणारे औषध विकसित केले आहे. या व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, त्याला त्याच्या परिणामांवर इतका विश्वास आहे की, जर तो मधुमेह बरा करू शकला नाही तर तो तुम्हाला 100 मिलियन रुपये देईल. हा दावा रजत शर्मा यांनी इंडिया टीव्हीवर केला आहे.
याच फेसबुक पेजवरून मधुमेहापासून (Diabetes) मुक्तीचा आणखी एक दावा अशाच पद्धतीने व्हायरल होत आहे. हे कथितपणे आज तक मधील एक व्हिडिओ दर्शविते ज्यामध्ये पत्रकार सुधीर चौधरी दावा करत आहेत की “डॉ देवी शेट्टी यांनी याआधीच एका अभिनव औषधाने दहा लाखांहून अधिक भारतीय नागरिकांना मधुमेहापासून मुक्त केले आहे.” आज या औषधाची मात्रा संपत चालली आहे कारण त्यात खूप लोकांना रस आहे.” पुढे असे म्हटले आहे की “खालील बटण दाबा आणि मधुमेहापासून मुक्त होण्याची संधी मिळवा.”
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हा दावा खोटा आहे. हे दोन्ही व्हिडिओ बनावट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत आजतक आणि इंडिया टीव्हीने या दाव्यांची पुष्टी करणारा असा कोणताही रिपोर्ट चालवलेला नाही. फेसबुकवर केलेल्या या दाव्यांमागचा उद्देश लोकांना त्यांच्या फायद्यासाठी बनावट लिंकवर क्लिक करायला लावणे हा होता.
Fact Check/Verification
आमच्या तपासाच्या सुरुवातीला आम्ही दोन्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिले. एका नजरेत पाहिल्यास असे दिसून येते की जे शब्द बोलले जात आहेत आणि जे ऐकले जात आहेत त्यात खूप फरक आहे. लिप्सिंक आणि बोलणे जुळत नाही. ज्यावरून हे दोन्ही व्हिडिओ एडिट झाल्याचे स्पष्ट होते.
पुढे, आम्ही ‘आज तक‘ किंवा ‘इंडिया टीव्ही’ द्वारे असे कोणतेही रिपोर्ट चालवले गेले आहेत का, हे शोधण्याचा प्रयत्न केला की असे औषध आले आहे की जे मधुमेहाचे रुग्ण फक्त एका डोसने बरे होऊ शकतात. आम्हाला असा कोणताही रिपोर्ट सापडला नाही. मात्र 14.11.2023 रोजी ‘जागतिक मधुमेह दिना’ला आजतकचे पत्रकार सुधीर चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेली पोस्ट आम्हाला आढळली, ते लोकांना मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचा आणि निरोगी जीवन जगण्याचा सल्ला देत आहेत, परंतु यादरम्यान ते फक्त एक डोस घेऊन मधुमेह बरा करू शकणाऱ्या कोणत्याही औषधाचा उल्लेख करत नाहीत. याबाबतचा संपूर्ण रिपोर्ट येथे पाहता येईल.
व्हायरल दाव्यामध्ये लोकांना त्यांचे लक्ष वेधण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही WHOis वर या लिंकचे डोमेन आणि इतर माहिती शोधली, परंतु आम्हाला आढळले की ही वेबसाइट काही काळापूर्वी 18.09.2023 रोजी नोंदणीकृत झाली होती. तसेच, रेजिस्ट्रेन्ट संपर्कातील नाव प्रायव्हेट ठेवण्यात आले आहे. आणि पत्ता एरिझोना, यूएस असा देण्यात आला आहे.
Conclusion
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की फेसबुक पेजवर केलेले मधुमेहाच्या औषधाशी संबंधित सर्व दावे खोटे आहेत. या दाव्यांमागचा उद्देश लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि वैयक्तिक फायद्यासाठी त्यांना बनावट वेबसाइटवर क्लिक करणे हा आहे.
Result: False
Our Sources
Report by Sudhir Chaudhry
Information about domain and registration on WHOis
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा