हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथावर माझा विश्वास नाही, असे राहुल गांधी म्हणाले. असे सांगत राहुल गांधींच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला मात्र सोशल मीडियावर पडणारा फेक पोस्टचा पाऊस सुरूच राहिला. ‘जय श्री राम’ वर बंदी घालण्याचे आवाहन मुस्लिम धर्मगुरू करीत आहे, असा दावा करण्यात आला. अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींवर सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्राने टीका केली, असा दावा करण्यात आला. सुरतमध्ये गणपतीला मोदींचा नोकर दाखविण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात रेल्वेत वृद्धाला झालेल्या मारहाणीनंतर पुन्हा एक मारहाणीची घटना घडली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
एका व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नुकतेच महाराष्ट्रात गोमांस बाळगल्याच्या संशयावरून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका वृद्धाला मारहाण झाल्याच्या घटनेनंतर या व्हिडिओला जातीय रंग देऊन शेअर केले जात असून