Sunday, April 28, 2024
Sunday, April 28, 2024

LATEST ARTICLES

लोकसभा निवडणूक 2024: बटाट्यापासून सोने काढणारी मशीन लावणार हे विधान राहुल गांधींचे आहे? जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यातच राजकीय पक्ष एकमेकांवर सोशल मीडियावर चिखलफेक करीत आहेत. यातूनच अनेक पोस्ट जन्म घेत आहेत. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाची एक व्हिडीओ क्लिपिंग शेयर करून केला जाणारा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. बटाट्यापासून सोने काढणारी मशीन लावणार असे विधान राहुल गांधींनी केल्याचे हा दावा सांगतो.

लोकसभा निवडणूक 2024: नागपुरात EVM वर शाई फेकली असे सांगत ठाण्यातील जुना व्हिडीओ होतोय शेअर

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एका व्यक्तीने मतदान केंद्रात ईव्हीएमवर शाई फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, तो माणूस मतदानासाठी ईव्हीएम प्रणालीच्या विरोधात घोषणा देताना ऐकायला मिळतो कारण पोलिस कर्मचारी त्याला मतदान केंद्राबाहेर ओढत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सनी 19 एप्रिल रोजी झालेल्या नागपूर मतदारसंघातील मतदानादरम्यानची घटना दर्शविल्याचा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला. न्यूजचेकरला हा दावा खोटा असल्याचे आढळले. व्हिडिओ 2019 चा आहे आणि त्यात ठाण्यातील एक घटना दाखवण्यात आली आहे.

Weekly Wrap: इराणचा हल्ला, मुख्यमंत्री शिंदेंनी खाल्ले मटण आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक

इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल्स असे सांगणारा दावा झाला. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात इंडिया आघाडीला आघाडी मिळाली आहे, असा दावा करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान ‘जुमला’ विरोधात इशारा देत आहे, असा दावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम नवमीला मटण खाणारे नकली धर्मवीर आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राम नवमीला मटण खाल्ले? जाणून घ्या सत्य काय आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राम नवमीला मटण खाल्ले, असे सांगत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आम्हाला X वर एका मराठी युजरने केलेला दावा सापडला. यामध्ये "रामनवमीला मटण खाणारा नकली #धर्मवीर" अशा कॅप्शनखाली मुख्यमंत्र्यांचा एक फोटो जोडण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे http://curlytales.com च्या एडिटर इन चीफ कामिया जानी यांच्यासोबत भोजन करताना दिसत आहेत.

Fact Check: ‘जुमला’ विरोधात आमिर खानचा इशारा? नाही, अभिनेत्याचा डीपफेक लोकसभा निवडणुकीपूर्वी होतोय व्हायरल

काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीत अभिनेता आमिर खान 'जुमला' विरोधात इशारा देत असल्याचे दाखवले आहे.

Fact Check: दैनिक भास्करने आपल्या सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी आघाडीवर असल्याचा दावा केला आहे का? सत्य जाणून घ्या

दैनिक भास्करची एक क्लिपिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक सर्वेक्षण दाखवण्यात आले आहे. या कथित सर्वेक्षणात 10 राज्यांमध्ये I.N.D.I.A आघाडी पुढे असल्याचा दावा केला जात आहे.