Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

LATEST ARTICLES

Weekly Wrap: पेट्रोल पंप वर किचेन वाटणाऱ्या लुटारूंचा संदेश, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या जडी बुटीची पोस्ट आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

या आठवड्यात सर्वत्र मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला तो पाण्याच्या प्रवाह विरोधात तरंगणाऱ्या जडी बुटीचा दावा. पेट्रोल पंपावर काही लुटारू किचेन वाटून आपला पाठलाग करतात आणि आपल्याला लुटू शकतात, हा समाजात भीती पसरविणारा दावा व्हायरल झाला होता. नासाने सूर्यातून येणार आवाज रेकॉर्ड केला असून त्यातून ओम असा आवाज येतो अशी पोस्ट पसरविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातला गेले असता त्यांनी आपल्या आई सोबत पत्नीचीही भेट घेतल्याचा दावा करण्यात आला. नटराज पेन्सिल कंपनीत पॅकेजिंग चा जॉब आहे आणि घरबसल्या पॅकेजिंग करून आपण ३० हजार रुपये कमवू शकता असा दावा करून अनेकांना ठकविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

पेट्रोल पंप वर किचेन देऊन होतेय लूट, असा मेसेज आपल्याला आलाय? हा भीती घालण्याचा एक प्रकार

महाराष्ट्र आणि विशेषतः बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्राशी जोडलेल्या सीमाभागात एक मेसेज सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. "सावधान, पेट्रोल पंप किंवा शॉपिंग मॉल मध्ये एकाद्या उत्पादनाच्या प्रमोशन च्या नावाखाली आपल्याला किचेन दिले जात आहेत. ते स्वीकारू नका. कारण त्या किचेन मधील विशिष्ट डिव्हाईस च्या माध्यमातून ट्रॅक होऊन तुम्ही लुटले जाऊ शकता." असे तो मेसेज सांगतो.

‘ओम’चा आवाज सूर्यातून निघाल्याचा दावा नासाने केला नाही, फेक पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल

अनेक सोशल मीडिया वापरकर्ते दावा करत आहेत की, सूर्याचा आवाज रेकॉर्ड केल्यानंतर नासाच्या लक्षात आले की त्यातून ओमचा आवाज येतो.

पीएम मोदींचा आई आणि जशोदाबेनसोबतचा हा फोटो खोटा आहे

गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी 4 डिसेंबर 2022 रोजी गांधीनगरमध्ये त्यांच्या आईला भेटायला गेले होते. पीएम मोदींच्या त्यांच्या आईसोबतच्या या भेटीचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एक फोटो देखील शेअर केला जात आहे ज्यामध्ये पीएम मोदी त्यांची आई आणि जशोदाबेनसोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहेत.

नटराज पेन्सिल पॅकिंगच्या नोकऱ्या देणार्‍या पोस्ट हे स्कॅम आहेत, जाणून घ्या सत्य काय आहे

"नटराज पेन्सिल पॅकिंग जॉब, घरून काम. अर्धवेळ नोकरी. दरमहा 30000 पगार. कामासाठी स्त्री-पुरुषांची तातडीची गरज. माझा संपर्क क्रमांक आणि व्हॉट्सअप नंबर." असे या पोस्ट मध्ये सांगितले जात आहे. अनेक पोस्टमध्ये संपर्क क्रमांक म्हणून वेगवेगळे क्रमांक दिलेले आहेत.

हिमालयात आढळणाऱ्या जडी बुटीचा व्हिडीओ पाहिलात का? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या तुफानी व्हायरल होत आहे. हिमालयात आढळणारी एक जडी बुटी आहे आणि ती पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात तरंगते असे सांगून एक पोस्ट व्हायरल केली जात आहेत. ही वनस्पती एक जडी बुटी असून ती अद्भुत आहे असा दावा करण्यात येत आहे.