सोशल मीडियावर एक पोस्टर खूप व्हायरल होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि बदला पुरा असे शब्द असलेले पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला धमकावत असल्याचे सांगणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा समूहाचे एमेरिटस चेअरमन, रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच, प्रमुख व्यक्तींसह अनेकांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये पूर्णियाचे खासदार पप्पू यादव रडताना दिसत आहेत. मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी जोडणारा हा व्हिडीओ शेअर केला जात असून दावा केला जात आहे की, पप्पू यादवने पहिल्यांदा लॉरेन्स बिश्नोईला धमकावले पण शुद्धीवर आल्यानंतर तो ढसाढसा रडू लागला.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकीकडे परतीचा पाऊस वाढत चाललेला असताना सोशल मीडियावरही फेक पोस्टचा पाऊस पडतच राहिला. गोव्यामध्ये ओव्हरलोडिंगमुळे बोट बुडाली, असा दावा एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. मराठी प्रमाणेच उर्दू भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे विधान उद्धव ठाकरेंनी केले आहे, असा दावा करण्यात आला. आईने मुलाचा मोबाईल काढून घेऊन अभ्यास करण्यास भाग पाडल्यानंतर त्याच्याकडून आईला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली, असा दावा करण्यात आला. गुगल इन्व्हेस्ट या गुंतवणूक प्लॅटफॉर्मचे समर्थन सुंदर पिचाई करीत आहेत, असा दावा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेतून महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.