सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.
जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतलेला नाही,
जपानने मायक्रोवेव्ह ओव्हनची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ‘मायक्रोवेव्ह उद्योग संपला !’ या शीर्षकाच्या लांबलचक लेखात दावा केला आहे की या निर्णयाला हिरोशिमा विद्यापीठाच्या एका अभ्यासाचे समर्थन करण्यात आले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की मायक्रोवेव्हमुळे अणुबॉम्बपेक्षा जास्त नुकसान होते, पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
सोशल मीडियात व्हायरल झालेला हा फोटो बुंदेलखंडमधील भावनी धरणाचा नाही
सोशल मीडियात व्हायरल झालेला फोटो बुंदेलखंडमधील भावनी धरणाचा असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर धरणाचा फोटो शेअर करून उत्तरप्रदेश सरकारने बुंदेलखंडमधील दुष्काळग्रस्त प्रदेश ललितपूरला भेट दिल्याचा दावा करण्यात आला. फोटोत दिसत असलेल्या धरणाचे वर्णन ललितपूरचे भवानी धरण असे करण्यात आले आहे. पण हे खरे नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा, हे आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य
बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा फडकत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. हिंदू देवता बालाजीला घेऊन जाणाऱ्या सर्व हिंदू मूर्तींसह संपूर्ण रथावर क्रॉसचे चित्र असेलला पांढरा झेंडा दाखवणारा एकोणीस सेकंदांचा व्हिडिओ ‘श्री बालाजी मिरवणुकीतील’ असल्याचा दावा ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. पण हे सत्य नाही. हा व्हिडिओ तिरुपती बालाजी रथाचा नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविलेला आहे?
ठाकरे सरकारने बोर्ड परीक्षेच्या फाॅर्ममधून ‘हिंदू’ शब्द हटविला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की,“सरकारने 10वी आणि 12वीच्या फॉर्ममधून ‘हिंदू’ हा पर्याय काढून टाकला आहे. राज्य सरकारने पुढील बोर्ड परीक्षांसाठी जाहीर केलेल्या नवीन फॉर्ममध्ये हिंदूऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द लिहिला आहे. पण हे खरे नाही. ठाकरे सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
फेसबुकचे गोपनीयता धोरण बदलण्याचा निर्णय Meta ने घेतला आहे का?
फेसबुकचे गोपनीयता धोरण बदलण्याचा निर्णय Meta ने घेतला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये एका व्हायरल फॉरवर्डने दावा केला आहे की नाव बदलण्यासोबत, मेटा फेसबुकच्या गोपनीयता धोरणात बदल करत आहे ज्यामुळे वापरकर्त्यांनी पोस्ट केलेले फोटो आणि इतर वैयक्तिक माहिती वापरता येईल. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.