Fact Check
Weekly Wrap: रागात गावाची वीज कापली, मोदींना ‘व्होट चोर’ म्हटले ते सलग सार्वजनिक सुट्टी जाहीर पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
सप्टेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यातही अनेक फेक पोस्ट पाहायला मिळाल्या. पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये ड्रोन वापरून फोटो बनवीत स्वागत करण्यात आले, असा दावा झाला. सलग सण आणि कार्यक्रमांमुळे केंद्र सरकारने ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत देशभरात सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, असा दावा करण्यात आला. मुलांनी संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींना ‘व्होट चोर’ म्हटले, असा दावा करण्यात आला. RBI च्या नव्या नियमांनुसार सप्टेंबर पासून पाचशे रुपयांच्या नोटा एटीएम मधून मिळणार नाहीत, असा दावा करण्यात आला. प्रेयसीचा फोन व्यस्त होता म्हणून प्रियकराने रागात गावाची वीज कापली, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

मोदींचे चीनमध्ये ड्रोन वापरून फोटो बनवीत स्वागत?
पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये ड्रोन वापरून फोटो बनवीत स्वागत करण्यात आले, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

३ ते ६ सप्टेंबरपर्यंत सलग सार्वजनिक सुट्टी जाहीर?
सलग सण आणि कार्यक्रमांमुळे केंद्र सरकारने ३ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत देशभरात सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

पंतप्रधान मोदींना ‘व्होट चोर’ म्हटले?
मुलांनी संभाषणादरम्यान पंतप्रधान मोदींना ‘व्होट चोर’ म्हटले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

पाचशे रुपयांच्या नोटा एटीएम मधून मिळणार नाहीत?
RBI च्या नव्या नियमांनुसार सप्टेंबर पासून पाचशे रुपयांच्या नोटा एटीएम मधून मिळणार नाहीत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

प्रियकराने रागात गावाची वीज कापली?
प्रेयसीचा फोन व्यस्त होता म्हणून प्रियकराने रागात गावाची वीज कापली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.