Saturday, September 30, 2023
Saturday, September 30, 2023

घरFact CheckViralWeekly Wrap : या आठवड्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुख्य दाव्यांची ही...

Weekly Wrap : या आठवड्यातील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुख्य दाव्यांची ही आहे तथ्य पडताळणी

राजस्थानच्या जोधपूरच्या नावाने एक व्हिडिओ शेअर केला जात होता. तसेच फेअर अँड लवलीच्या संदर्भात एक संदेश व्हायरल झाला. पण हा देखील दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. या आठवड्यात न्यूजचेकरने काही प्रमुख दाव्यांची पडताळणी केली आहे. त्याचा संक्षिप्त अहवाल तुम्ही इथे वाचू शकता. 

जातीयवादाच्या नावाखाली शेअर केला जाणारा मारहाणीचा व्हिडिओ खरंच राजस्थानातील आहे ?  

राजस्थानच्या जोधपूरमध्ये नुकतीच एक धार्मिक हिंसा घडली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. पण हा दावा भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

१५ मुलांचा बाप असलेला मुस्लिम व्यक्ती खरंच भारतातील आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात असा दावा केला होता की, व्हिडिओत दिसणारा व्यक्ती मुस्लिम असून तो भारतातील आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटच्या संदर्भात एक भ्रामक संदेश सोशल मीडियावर व्हायरल 

नेस्लेच्या किटकॅट चॉकलेटमध्ये बीफमधून काढलेला रस वापरला जातो, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे? 

सोशल मीडियावर शरद पवार यांच्या भाषणाची एक व्हिडिओ व्हायरल झाली. पण तो भ्रामक दाव्यासोबत शेअर केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

फेअर अँड लवलीमध्ये खरंच डुक्कराचे तेल वापरले जाते? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला. त्यात दावा केला होता की, फेअर अँड लवलीमध्यर डुक्कराचे तेल वापरले जाते. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular