Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap: बॉक्सर डिंको सिंह यांच्या निधनापासून ते अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेपर्यंत,...

Weekly Wrap: बॉक्सर डिंको सिंह यांच्या निधनापासून ते अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेपर्यंत, या आठवड्यात सोशल मीडियावरील दाव्यांची तथ्य पडताळणी 

बॉक्सर डिंको सिंह यांचे १० जून २०२२ रोजी निधन झाले, असा दावा केला जात होता. तसेच एक फोटोच्या माध्यमातून दावा केला जात होता की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर आहे. पण हे दोन्ही देखील दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही ते संक्षिप्तपणे इथे वाचू शकता. 

आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते बॉक्सर डिंको सिंह यांचे १० जून २०२२ रोजी निधन झाले? याचे सत्य जाणून घ्या 

महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने बातमी छापली होती की, बॉक्सर डिंको सिंह यांचे १० जून २०२२ रोजी निधन झाले. हा दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासंबंधितचे हे विधान खरंच केले आहे? भ्रामक दावा व्हायरल 

सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दावा केला जात होता की, शरद पवारांनी राष्ट्रपती पदासंबंधितचे विधान केले आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

जम्मूमध्ये खरंच नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लोकं एकत्र जमले होते? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाली. त्यात नुपूर शर्माच्या समर्थनासाठी जम्मूमध्ये रॅली काढली, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे? याचे सत्य जाणून घ्या 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अमेरिकेच्या १०० डॉलरच्या नोटेवर असल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

गोळीबाराचा व्हायरल व्हिडिओ नुकत्याच कानपूरमध्ये झालेल्या हिंसेचा आहे ? जाणून घ्या याचे सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात होता. त्यात दावा केला जातोय की, कानपूरमध्ये काही धर्माचे विशिष्ट लोक पोलिसांवर शस्त्राने गोळीबार करत आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular