Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap : हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस मिसळण्यापासून ते गटारीच्या पाण्याने भाज्या...

Weekly Wrap : हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस मिसळण्यापासून ते गटारीच्या पाण्याने भाज्या धुणाऱ्या व्यक्तीचा केला जाणारा दावा, आठवड्यातील या आहेत टॉप फेक न्यूज

आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या विविध पोस्ट वाचतो. त्याच्या विषयी लोकं अनेकदा आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्यातील बहुतांश दावे हे भ्रामक असतात. आमच्या टीमने या आठवड्यातील अशाच काही फेक बातम्यांच्या आम्ही पडताळणी केली आहे.

हल्दीरामच्या फलाहारी नमकीनमध्ये मांस सापडल्याचा खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर हल्दीरामच्या एका व्हिडिओवरून वाद झाला आहे. त्यात असं सांगितलंय की, हल्दीरामवाले फलाहारी नमकीनमध्ये मांस मिसळतांना पकडले गेले आहे. तुम्ही याचे फॅक्ट चेक इथे वाचू शकता.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातपंपाने पाणी पितानाचा जुना फोटो भ्रामक दाव्यासोबत व्हायरल

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हातपंपाने पाणी पितांनाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. पण हा फोटो जुना आहे, असं आमच्या पडताळणीत आढळले. याचे फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे खरंच आदेश दिले होते?

सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल झाली. त्यात असा दावा केलाय की, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. याचे फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

गटारीच्या पाण्याने भाज्या धुणाऱ्या त्या व्यक्तीचा फोटो जुना आहे, जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात असा दावा केलाय की, एका व्यक्तीने गटारीच्या पाण्याने भाज्या धुतल्या आणि तो त्या हिंदू वस्तीत विकायला जाणार आहे. याचे फॅक्ट चेक तुम्ही इथे वाचू शकता.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular