Sunday, November 3, 2024
Sunday, November 3, 2024

HomeFact CheckWeekly wrap: टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन ते आरएसएसमुळे मुस्लिमांचे स्थलांतर, या आहेत...

Weekly wrap: टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन ते आरएसएसमुळे मुस्लिमांचे स्थलांतर, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

Weekly wrap

भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन, भाजपाची महाराष्ट्रात दुटप्पी भुमिका?

भाजपशासित कर्नाटकच्या टिपू सुलतान चित्ररथाचे राजपथावर संचलन 26 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले पण महाराष्ट्रात भाजपा टिपू सुलतानच्या नावाला विरोध करत आहे. भाजपा ही दुटप्पी भुमिका का घेत आहे असा सवाल चित्ररथाचा फोटो शेअर करत व्हायरल सोशल मीडिया पोस्टमध्ये विचारला जात आहे, पण हे खरे नाही. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी? हे आहे व्हायरल पोस्टचे सत्य

बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी ठरत असल्याच्या दाव्याने एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. पण हे खरे नाही व्हायरल दावा चुकीचा आहे. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.

केंद्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाविषयी ट्विट करुन म्हटले आहे की,”कॉर्पोरेट टॅक्स 18% वरून 15% पर्यंत कमी केला मात्र, प्राप्तिकराची मर्यादा वाढवणं आणि कराचा दर कमी करण्याबाबत कोणतीही घोषणा नसल्यानं मध्यमवर्गीय नोकरदारांची,सामान्य करदात्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे.” पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ऑऑण फॅक्ट चेक इथे वाचा.

भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल, जाणून घ्या सत्य 

सोशल मीडियात भारतमातेचा फोटो हिसकावणा-या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोस्टमध्ये म्हटले आहे की, बघा काय परिस्थिती आहे 26 जानेवारीला…. भारतमातेच्या फोटोच्या पूजनाला कशी विरोध करते ही *so called secular* महिला….., एवढी दादागिरी करतात?! महाराष्ट्रात नक्की हिंदुत्ववादी सेनेचीच सरकार आहे ना……? पण हे खरे नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले?

आरएसएसने अहमदाबादमधील पिराना गावातील मुस्लिमांना स्थलांतर करण्यास भाग पाडले असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येत आहे की, हिंदू संघटनेच जवळपास 400 लोक पिराणा गावात घुसून मुस्लिमांना पळून जाण्यास भाग पाडले आहे. पण व्हायरल दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular