Friday, September 24, 2021
Friday, September 24, 2021
घरFact ChecksWeekly Wrap: तालिबानी अत्याचार ते जगभरातील अन्य महत्वांच्या मुद्दयांपर्यंत, आठवडभरात व्हायरल झालेल्या...

Weekly Wrap: तालिबानी अत्याचार ते जगभरातील अन्य महत्वांच्या मुद्दयांपर्यंत, आठवडभरात व्हायरल झालेल्या टाॅप फेक दाव्यांचे फॅक्ट चेक

सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जेथे दररोज फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सोशल मीडिया युजर्स दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती शेअर करताना दिसतात. या आठवड्यात असेच काही घडले.श्रीनगरमध्ये स्वांतत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी पकडल्याची तसेच तालिबानने महिलांची विक्री सुरु केली असल्याची तसेच अनेक इतर विषयांवर युजर्सनी या आठवड्यात चुकीची माहिती शेअर केली. आमच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे आणि त्यांचे सत्य आपल्यासमोर मांडले आहे.

श्रीनगरमध्ये दहशतवादी पकडल्याचा नाही व्हायरल व्हिडिओ,जाणून घ्या सत्य

सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात एका मोटारसायकलस्वाराला पोलिस मोठ्या शिताफिने पकडत असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, स्वातंत्र्यदिनाच्या आधी एक दिवश जम्मू कश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडल्याचा हा व्हिडिओ आहे. पण हे सत्य नाही. हा व्हिडिओ भारतातील नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

भारतीय हवाई दलाच्या सी-17 विमानाने अफगाणिस्तानातून 800 भारतीयांना एअर लिफ्ट केले?

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये लष्करी विमानात लोकांचा जमाव बसलेला दिसत आहे. दावा केला जात आहे की हा फोटो भारतीय हवाई दलाच्या विमान सी -17 चा आहे. ज्यामध्ये 800 भारतीयांना अफगाणिस्तानातून एअर लिफ्ट करुन आपल्या देशात आणण्यात आले आहे. पण हे सत्य नाही. हा फोटो आठ वर्षापूर्वीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

एसटीने ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किलोमीटर मोफत प्रवास योजना सुरु केलेली आहे?

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 4000 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. त्याकरता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. असा दावाकेला जात आहे. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ तालिबान महिलांचा लिलाव करत असल्याचा आहे का?

सोशल मीडियात एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात बुरख्यातील काही महिलांना साखळीने बांधले असून त्यांची बंदुकधारी लोकांकडून बोली लावली जात आहे. दावा केला जात आहे की, तालिबानींनी अफगाणिस्तानमधील महिलांचा लिलाव सुरु केला आहे.पण हे सत्य नाही हा व्हिडिओ अफगाणिस्तानीतल नाही. कुर्दीश आंदोलकांच्या लंडनमधील पथनाट्याचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular