Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckWeekly Wrap : या आठवड्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकरांच्या विधानापासून ते...

Weekly Wrap : या आठवड्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकरांच्या विधानापासून ते इंदोरमधील ‘लव्ह जिहाद’च्या व्हिडिओपर्यंतच्या मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी

आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकर यांनी विधान केलंय. तसेच इंदोरमधील व्हायरल व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’चा आहे, असा दावा केला जात होता. पण हे दोन्ही दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. या आठवड्यात न्यूजचेकरने अशाच काही दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. इथे तुम्ही ते सविस्तरपणे वाचू शकता.

आरक्षणाच्या मुद्द्यावर डॉ. भीमराव आंबेडकर यांनी हे खरंच विधान केलंय? चुकीचा दावा व्हायरल  

डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर विधान केल्याचा दावा केला जातोय. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

फोटोत रिक्षाजवळ उभे असलेले व्यक्ती हे खरंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे? चुकीचा दावा व्हायरल 

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. त्यात दावा केला जातोय की, हा फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे खरंच दुर्लक्ष केले? भ्रामक दावा व्हायरल 

सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे असा दावा केला जातोय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दुर्लक्ष केले. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

इंदौरमधील व्हायरल व्हिडिओ खरंच ‘लव्ह जिहाद’चा आहे? याचे सत्य जाणून घ्या 

इंदोरमधील व्हिडिओ ‘लव्ह जिहाद’चा असल्याचा दावा केला जात आहे. पण आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular