Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

जगातील सर्व देश आपल्या युक्रेन मधील नागरिकांची मदत करण्यास असमर्थ ठरत असताना एकटा भारतच आपले विद्यार्थी,नागरिक यांची सुटका करत आहे. याचे पडसाद पाकिस्तानी संसदेत उमटले व तिथे मोदी- मोदीचे नारे लागले असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. पण पाकिस्तानने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या नॅशनल असेंब्लीत मोदी-मोदी चे नारे लागल्याचा दावा खोटा आहे. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.

शेतक-याने वीजेच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्या केली असल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक यात एक व्यक्ती ट्रांस्फार्मरवर चढलेला दिसत आहे तर खालून काही लोक त्याला आवाज देत आहेत. पण तो कुणाचेच एेकत नाही, तो ट्रांसफार्मरचा खटका हाताने ओढतो त्यावेळी जाळ निर्माण होतो आणि तो खाली फेकला जातो. पण हे खरे नाही याचे फॅक्ट चेक इथे वाचा.

गुडघे टेकून मतदाराच्या पाया पडण्या-या भाजपा उमेदवाराचा व्हिडिओ उत्तरप्रदेश निवडणुकीदरम्यानचा असल्याचा दावा व्हायरल झाला आहे.यूपीमध्ये ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झालेय यााबच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये फुलांचा हार घातलेला एक व्यक्ती गुडघे टेकून लोकांच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे. पण हे खरे नाही याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

आजतकच्या स्क्रिनशॉटमध्ये दावा केलाय की, वाहिनीने दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये असदुद्दीन ओवेसी यांची पार्टी एआयएमआयएम यांना युपीत ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. स्क्रिनशॉटमध्ये भाजपला १८०, समाजवादी पार्टीला १९० आणि बसपाला २० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण हे खरे नाही. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.

उत्तर प्रदेशात निवडणुका संपल्यानंतर 8 मार्च 2022 रोजी दुसऱ्याच दिवशी ईव्हीएमवर गोंधळ सुरू झाला. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही व्हिडिओ शेअर करत वाराणसीमध्ये प्रशासनावर ईव्हीएमची अदलाबदली केल्याचा आरोप केला. पण हे खरे नाही. याचे फॅक्ट चेक इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
October 4, 2025
Prasad S Prabhu
September 27, 2025
Prasad S Prabhu
September 13, 2025