Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

Monthly Archives: November, 2022

महाराष्ट्रात मशिदींपेक्षा मंदिरांना जास्त वीज बिल आकारत नाहीत, व्हायरल दावा खोटा

आपल्या भारत देशात किंवा महाराष्ट्रात मशिदींपेक्षा जास्त दराने मंदिरांसाठी वीजबिल आकारले जाते. असा दावा सध्या केला जात आहे. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील असा दावा करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. आपला देश एकीकडे धर्मनिरपेक्ष म्हणायचा आणि दुसरीकडे मंदिर आणि मशिदीच्या बाबतीत असा दुजाभाव करायचा असे सुरु असल्याचे व्हायरल मेसेज सांगतो.

Weekly Wrap: वीजबिलाचे स्कॅम, फिफा मधील धर्मांतरण आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

या आठवड्यात प्रामुख्याने गाजला तो ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या न झालेल्या निधनाचा दावा. अद्याप उपचार सुरु असताना या सिलिब्रिटीला डेथ हुवॉक्स ला सामोरे जावे लागले. हार्दिक पटेल ने तिकीट मिळताच भाजपवर तोंडसुख घेतले असो वा वादग्रस्थ फरार मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईक ने फिफा वर्ल्ड कप मध्ये धर्मांतरण करविल्याचा दावा असो हे मुद्दे सोशल मीडियावर चांगलेच गाजले. तुमची वीज कापायची नसेल तर संपर्क साधा अशी भीती घालून होत असलेले स्कॅम संभ्रम निर्माण करणारे ठरले. हिमालया या कंपनीला व्हायरल दाव्यान्नी पुन्हा एकवार टार्गेट केले तर एक जुना व्हिडीओ शेयर करून पुन्हा एकदा फिफा वर्ल्ड कप मध्ये सामूहिक धर्मांतरण झाल्याचा दावा व्हायरल करण्यात आला. राहुल गांधी यांचा अनुवादक मधूनच निघून गेला या आणि अनेक प्रकरणांवर व्हायरल झालेल्या खोट्या दाव्यांचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

2018 चा व्हिडिओ कतार FIFA विश्वचषकात सामूहिक धर्मांतरण सोहळा म्हणून होतोय व्हायरल

2022 FIFA विश्वचषक गेल्या रविवारी कतारमध्ये सुरू झाला, वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू आणि भारतातून फरार झाकीर नाईक यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात धर्मांतर झाल्याचा आरोप करणाऱ्या दाव्यांच्या भाऊगर्दीत सुरुवात झाली. आता, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, "कतारमधील गैर-मुस्लिमांनी इस्लाम स्वीकारला आहे" असा दावा करून हा व्हिडीओ पसरत असून हे सामूहिक धर्मांतरण एका धर्मोपदेशकाने केल्याचा दावा होत आहे.

विक्रम गोखले निधनाची अफवा मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून

प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याची अफवा बुधवारी रात्री पासून जोरदार पसरली आहे. दीनानाथ मंगेशकर इस्पितळात गोखले यांचा मृत्यू झाल्याचे सांगून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहून हजारो पोस्ट व्हायरल झाल्या.

हलाल वरून पुन्हा एकदा हिमालया टार्गेट, जाणून घ्या सत्य काय आहे

औषधे, कॉस्मेटिकस आणि काही खाद्यपदार्थ बनविणारी कंपनी 'हिमालया' पुन्हा एकदा सोशल मीडियावर टार्गेट वर आली आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेली एक माहिती शेयर करीत या कंपनीने आपण हलाल प्रमाणित उत्पादने विकत असल्याचे स्वतःच कबूल केल्याचे सांगितले जात आहे. अशा कंपनीची उत्पादने हिंदूंनी कशी खरेदी करायची? असा प्रश्न उपस्थित करून काही युजर्सनी हिंदू धर्म भ्रष्ट होईल असा दावा केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022: राहुल गांधींचे भाषण समजले नाही म्हणून अनुवादक निघून गेला? जाणून घ्या सत्य काय आहे

राहुल गांधींच्या जाहीर भाषणादरम्यान एक गुजराती अनुवादक स्टेजवरून मध्यभागी निघून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. ज्यांनी 24 सेकंदांचे फुटेज शेअर केले त्यांनी असा आरोप केला की भाषांतरकाराने स्टेज सोडला कारण त्याला राहुल गांधी यांना काय सांगायचे होते ते "समजून घेण्यास आणि भाषांतरित करण्यात अवघड जात" होते.

वीजबिल न भरल्यास तुमचा वीजपुरवठा खंडित होईल असा मेसेज आला आहे? व्हायरल मेसेज एक स्कॅम आहे

मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’. असे मेसेज पाठवून महावितरण च्या वीज ग्राहकांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रकार पुन्हा एकदा सुरु झाला आहे. अनेक ग्राहकांना संदेश पाठवून असे आवाहन केले जात आहे की, आपण संबंधित क्रमांकांवर तातडीने संपर्क न साधल्यास आपला वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडविली आहे. हे मेसेज अर्थात एस एम एस मोबाईल क्रमांकावर थेट येतात. संबंधित क्रमांकांवर संपर्क साधल्यास एखादे अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले जाते किंवा काहीवेळा पैशांची मागणी होते. यामुळे वीजग्राहक संभ्रमात आहेत.

झाकीर नाईकचा ६ वर्ष जुना व्हिडिओ फिफा वर्ल्ड कप २०२२ ला जोडून होतोय शेअर

वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ दरम्यान झाकीर नाईकने चार जणांना इस्लाम मध्ये धर्मांतरित केल्याचा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळताच हार्दिक पटेलने भाजपवर टीका केली का? येथे जाणून घ्या संपूर्ण सत्य

गुजरात विधानसभा निवडणुकीचा उत्साह वाढत असताना भाजप नेते हार्दिक पटेल यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ते भाजप सरकारवर टीका करताना दिसत आहेत. तिकीट मिळाल्यानंतरच हार्दिक पटेलने रंग बदलला आणि आता भाजपवर टीका करत असल्याचा दावा केला जात आहे.

Weekly Wrap: शाहरुख खानचा जुना व्हिडिओ, गुगल पे बद्दल व्हायरल दावा आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक

आठवड्याच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांनी रोखल्याचा दावा व्हायरल झाला. तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्यात येत असल्याच्या संदेशांनी संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. या जगात गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो श्वसन करताना आतमध्ये ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडतो असा दावा करण्यात आला, तर अफजल खानाची कबर पाडली म्हणून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो हाती घेतल्याचा दावा करण्यात आला.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read