Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

Monthly Archives: November, 2023

Fact Check: उत्तराखंड खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका केल्याचे फुटेज म्हणत जुना व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की हे उत्तराखंड खाणीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात आली तेंव्हाचे फुटेज आहे.

उत्तराखंड रेस्क्यू: बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम म्हणून एआयने जनरेट केलेली इमेज होतेय शेयर

उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम दर्शविणारा फोटो.

तेलंगणात काँग्रेसच्या बहुमताचा दावा करण्यासाठी बनावट NDTV पोल ऑफ पोल्स ग्राफिक्स होतेय शेअर

NDTV पोल ऑफ पोलने तेलंगणाच्या राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा स्पष्ट विजय घोषित केला आहे.

Fact Check: सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणण्यात आली ते दर्शविणारा हा व्हिडीओ? जाणून घ्या सत्य काय आहे

सीतामाता श्रीलंकेतील अशोकवनात बसलेली शिळा अयोध्येला आणण्यात आली ते दर्शविणारा हा व्हिडीओ आहे. असा दावा करण्यात सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे.

Weekly Wrap: भारताचा जीडीपी, ५ मिनिटात पाठदुखी बंद करण्याचा उपचार ते भारत मातेच्या अपमानापर्यंत प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल करण्यात आले. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असल्याचा दावा करण्यात आला. कायरोप्रॅक्टिक उपचाराने ५ मिनिटात पाठदुखी बंद होते. असा दावा करण्यात आला. सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका छायाचित्रात दिसत आहेत. असा दावा करण्यात आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारतमातेचा अपमान केला. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: कायरोप्रॅक्टिक उपचाराने पाठदुखीपासून पाच मिनिटांत आराम मिळेल हा दावा दिशाभूल करणारा

रजनीश कांत नावाच्या फेसबुक पेजवरून असा दावा केला जात आहे की कायरोप्रॅक्टिक उपचाराने केवळ पाच मिनिटांत पाठदुखी दूर होते. या पेजवर उपचाराच्या अनेक व्हिडिओ क्लिप पोस्ट करण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे असे दाखवण्यात येत आहे की कायरोप्रॅक्टिक उपचाराने अनेक लोकांच्या वेदना अवघ्या पाच मिनिटांत दूर झाल्या आहेत. या सर्व व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “अवघ्या पाच मिनिटांत वेदना कशी नाहीशी होते”. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. सर्व प्रकारच्या पाठदुखीवर केवळ पाच मिनिटांत उपचार होऊ शकत नाहीत.

Fact Check: राहुल गांधी यांनी भारत मातेचा अपमान केल्याचा दावा करणारा क्लिप्ड व्हिडिओ व्हायरल

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका सभेत लोकांना भारत मातेचा अर्थ विचारताना दिसत आहेत. “राहुल गांधींना भारत मातेचा अर्थ माहित नाही आणि ते भारत मातेचा अपमान करत आहेत” असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Fact Check: भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर सध्या भारताच्या जीडीपी संदर्भात एक दावा केला जात आहे. भारताच्या जीडीपीने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. असा हा दावा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून हा दावा केला आहे.

Fact Check: फोटोत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे

सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका फोटोमध्ये दिसत आहेत. असा दावा एक फोटो शेयर करून केला जात आहे.

Weekly Wrap: चितळे बंधूंची मिठाई, इस्राईलचा संघर्ष ते मधुमेहाच्या औषधांपर्यंत प्रमुख फॅक्टचेक

दिवाळीच्या पहिल्या दिवशी चितळे बंधू सैनिकांना मिठाई देतात, असा दावा करण्यात आला. असे औषध विकसित केले आहे ज्याचा फक्त एक डोस घेतल्यास मधुमेह बरा होईल, असा दावा करण्यात आला. पॅलेस्टिनींना बाहेर पडण्यासाठी तिरंग्याचा आधार घेऊन चालावे लागते, असा दावा करण्यात आला. फ्रेंच निमलष्करी दलातील महिलांनी मेट्रो अंडरपासमध्ये छळ करणाऱ्या पुरुषांच्या गटाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read