Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

Monthly Archives: October, 2023

Fact Check: अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानला रतन टाटा 10 कोटी देणार का? व्हायरल दावा खोटा आहे

अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानबद्दलचा एक दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय झेंडा घेऊन फिरल्याबद्दल आयसीसीने राशिद खानला ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे या व्हायरल दाव्यात म्हटले जात आहे. यानंतर उद्योगपती रतन टाटा यांनी राशिद खानचा दंड स्वतः भरणार असल्याचे जाहीर केले आणि १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले.

Fact Check: केरळमध्ये बुरखा नसलेल्या प्रवाशांना बसमध्ये चढण्यापासून रोखण्यात आल्याचा खोटा दावा व्हायरल

केरळमध्ये बुरखा न घालणाऱ्याना बसमध्ये चढण्यापासून रोखण्यात आल्याचा दावा करणारा ५१ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “न्यू केरळ स्टोरी, आता हिंदू महिलांना #हलाल सर्टिफाईड व्हावे लागणार? केरळमध्ये मुस्लिम महिलांनी मारहाण केली, बसमध्ये फक्त बुरखा घातलेल्या महिलांना घेण्याची मागणी केली. व्हायरल पोस्ट येथे पाहिली जाऊ शकते.

Fact Check: पाकिस्तानबद्दल जोरदार टीका करणारी ही महिला कोण आहे?

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.

2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने ‘फ्री रिचार्ज योजना’ सुरू केली? अशी कोणतीही योजना नाही

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अधिकाधिक नागरिकांनी भाजपाला मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी “तीन महिने मोफत रिचार्ज” देत आहेत.

Fact Check: मराठा आंदोलनात बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी तिघांना अटक, पाच वर्षे जुने कटिंग पुन्हा व्हायरल

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहे. यापार्श्वभूमीवर एक पेपर कटिंग व्हायरल होत आहे. मराठा आंदोलनात बॉम्ब स्फोट करण्याचा कट उघडकीस आला असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. असा दावा केला जात आहे.

Weekly Wrap: रोनाल्डोला शिक्षा, दिग्विजय सिंघांचा राजीनामा, प्लास्टिकचे गहू आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर बनावट पोस्टचा धुमाकूळ कायम राहिला. एका महिलेला आलिंगन दिल्यावरून व्यभिचार केल्याचा आरोप ठेऊन फुटबॉलपटू रोनाल्डोला इराण येथील न्यायालयाने फटाके मारण्याची शिक्षा दिली, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. असा दावा करण्यात आला. भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविण्यात येत आहेत, असा दावा करण्यात आला. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी मोटार फिट ग्लायडरमधून किंवा पॅराशूट मधून हमासचे सैनिक उतरले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

क्रिस्टियानो रोनाल्डोला इराणमध्ये व्यभिचारासाठी 99 फटके मिळणार? व्हायरल दावा खोटा आहे

अनेक सोशल मीडिया युजर्स असा दावा करत आहेत की इराणने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला व्यभिचाराबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा दिली आहे. दाव्यांनुसार, फुटबॉलपटू त्याची चाहती, चित्रकार आणि दिव्यांग महिला फातिमा हमामी या महिलेसोबत हस्तांदोलन आणि आलिंगन देताना दिसल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे

खाद्यपदार्थात होणारी भेसळ हा चिंतेचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर बनावट गहू बनविले जात असल्याचे सांगत एका कारखान्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दावा आहे की, प्लास्टिक पासून गहू तयार करून गव्हात भेसळ केली जात आहे.

Fact Check: एमपीचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला नाही, बनावट पत्र व्हायरल

मध्यप्रदेश निवडणुकीत तिकीट वाटपावरून नाराज झालेले राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा सोशल मीडिया यूजर्स करत आहेत.

Fact Check: पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा हा व्हिडिओ इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी संबंधित नाही

पॅराशूटने उतरणाऱ्या लोकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्यात दावा केला जात आहे की "हे दृश्य इस्रायलचे आहे, जिथे हमासचे सैनिक मोटर फिट केलेल्या ग्लायडरमधून उतरले आणि उद्यानांमध्ये उत्सव साजरा करत असलेल्या इस्रायली नागरिकांवर गोळीबार सुरू केला".

CATEGORIES

ARCHIVES

Most Read