Saturday, April 27, 2024
Saturday, April 27, 2024

Monthly Archives: February, 2024

Fact Check: नाशिकमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज बनावट सांप्रदायिक दाव्यासह व्हायरल

सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज या दाव्यासह शेअर केले जात आहे की, महाराष्ट्रातील नाशिकमध्ये एका मुस्लिम व्यक्तीने डॉ कैलाश राठी यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Fact Check: अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले? जाणून घ्या सत्य

केंद्रीय गृहमंत्री अमोल शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर संसदेत दाखविण्यात आले. असे सांगणारा एक दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.

Fact Check: तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला? जाणून घ्या सत्य काय आहे

तामिळनाडू पोलिसांना एक कंटेनर भरून मुलांचे मृतदेह सापडले असून लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराचा प्रकार उघडकीस आला आहे. असे सांगणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे. संबंधित संदेश एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात असून व्हिडिओत व्हाईस ओव्हर आणि एका छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे.

Weekly Wrap: शेतकरी आंदोलन, पोलिसांचा संदेश, पाकिस्तान ध्वजाचा देशद्रोह आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

मागील आठवड्यातही सोशल मीडियावर असंख्य फेक दावे व्हायरल झाले. शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारूचे वाटप होत आहे, असा दावा करण्यात आला. चित्रात दिसणारी महिला AIMIM नेते वारिस पठाण यांची पत्नी, सख्खी बहीण आणि सावत्र आई आहे, असा दावा करण्यात आला. इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे, असा दावा करण्यात आला. एका छायाचित्राच्या माध्यमातून मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर असे घाव करीत आहे, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला? खोटा आहे हा दावा

पाकिस्तानचा झेंडा भारतात कुठेही फडकावल्यास सुनावणीविना देशद्रोहाचा खटला चालविणार असा निर्णय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला असून याबद्दल त्यांचे अभिनंदन असा दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे.

Fact Check: शेतकऱ्यास मारहाण म्हणून व्हायरल फोटो जुना आणि शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित अनेक दावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच क्रमाने शेतकऱ्यास मारहाण म्हणून एक फोटो व्हायरल झाला आहे. मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर असे घाव करीत आहे. असा दावा या व्हायरल फोटोच्या माध्यमातून केला जात आहे.

Fact Check: इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे? खोटा आहे हा दावा

इंटर स्कुल्स नावाच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ नका असे आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केले आहे. हा ग्रुप ISIS शी संबंधित असून त्याच्या ग्रुपमध्ये एकदा समाविष्ट झाल्यास बाहेर पडता येत नाही. असे सांगणारा एक दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

AIMIM नेते वारिस पठाण आणि चित्रात दिसणारी महिला यांच्यात काही नातेसंबंध आहेत का?

AIMIM नेते वारिस पठाण यांचा एका महिलेसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याबद्दल दावा केला जात आहे की ही महिला त्यांची पत्नी, सख्खी बहीण आणि सावत्र आई आहे

Fact Check: दारू वाटपाचा सुमारे 4 वर्षे जुना व्हिडिओ सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा म्हणून पुन्हा व्हायरल

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारूचे वाटप होत आहे.

Weekly Wrap: शेतकरी आंदोलनाशी संबंधित दावे आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाशी संबंधित दावे आणि इतर अनेक दाव्यांनी मागील आठवड्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. लोकसभा निवडणूक जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रात ११ एप्रिलपासून ४ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे, असा दावा करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वात अबकी बार ४०० पार हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्य केले आहे, असा दावा करण्यात आला. राहुल गांधींनी 50 आणि 15 ची बेरीज 73 सांगितली, असा दावा करण्यात आला. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांना ट्रॅक्टरखाली ‘चिरडले’, असा दावा करण्यात आला. शेतकरी आंदोलनामुळे रस्ता ठप्प झाल्यामुळे नाराज, एक वृद्ध महिला आंदोलकांवर संतापताना दिसत आहे. असा दावा करण्यात आला. बॅलेट पेपर संदर्भात मोदी चुकून खरे बोलले असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read