Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

Monthly Archives: July, 2023

Fact Check: जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये? खोटा आहे हा दावा

मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलच्या नावे एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हाट्सअप च्या माध्यमातून हा दावा सध्या केला जात आहे. आता हार्ट अटॅक ला घाबरण्याची गरज नाही. या इस्पितळात नवी सीटी अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून येथे फक्त ₹5000 इतकाच खर्च येतो असे हा दावा सांगतो.

Weekly Wrap: मणिपूर हिंसाचारात आरएसएस, ढबू मिरचीत साप, स्टार चिन्हाच्या नोटा, मध्यरात्री येणार कॉस्मिक किरण आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

पावसाचा रोज वाढत असताना त्याच प्रमाणात बनावट दाव्याचा पाऊसही सोशल मीडियावर जोरदार पडला. मागील आठवड्यात अनेक दावे करण्यात आले. मणिपूरात महिलांची विवस्त्र धिंड काढणारे आरएसएसशी संबंधित आहेत, असा दावा करण्यात आला. स्टार चिन्ह असलेल्या ₹५०० च्या नोटा बनावट असल्याचा दावा करण्यात आला. ठराविक दिवस न सांगता तुमचे मोबाईल आणि टॅब्लेट्स दूर ठेवा कारण पृथ्वीजवळून मध्यरात्री कॉस्मिक किरण जाणार आहेत. असा दावा करण्यात आला. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सांगण्यावरून नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून आंदोलन करत आहे. असा राजकीय दावा करण्यात आला. ढबू मिरचीत विषारी साप आढळत असल्याचा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा

नागरिकांच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी दाखविणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, हिरव्या मिरचीत जगातील सर्वात लहान विषारी साप आढळून आला असून मिरची आहारात वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Fact Check: यूपीमध्ये नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा म्हणून दिशाभूल करीत व्हायरल

मणिपूरमधील नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून निषेध करत आहे आणि हे सर्व काँग्रेसच्या सांगण्यावरून सुरु असल्याचा दावा सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करीत केला जात आहे.

मोबाईल लांब ठेवा मध्यरात्री पृथ्वीजवळून कॉस्मिक किरण जातील, असा मेसेज आलाय? काळजी नको, इथे वाचा

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, प्रत्येकाने आपले मोबाईल दूर किंवा बंद ठेवावे कारण मध्यरात्री कॉस्मिक (वैश्विक) किरण पृथ्वीच्या फार जवळ जाणार आहेत. असे म्हटलेले आहे. हा व्हायरल मेसेज व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक ग्रुपवर मोठ्याप्रमाणात शेअर झाला आहे.

Fact Check: नंबर पॅनलमध्ये ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा कायदेशीर आणि वैध

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून * ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बाजारात चलनात येऊ लागल्या आहेत. या नोटा बनावट असून काळजी घ्या असे आवाहन करणारा दावा सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात फिरू लागला आहे. फेसबुकच्या माध्यमातून हा दावा केला जात असून व्हाट्सअपवरही व्हायरल झाला आहे.

“आगीत तेल टाकणे, एक मूर्खपणाचे कृत्य”: मणिपूर हिंसाचारात दोषी ठरवीत पसरविल्या जाणार्‍या फेक न्यूजवर मणिपूर भाजप उपाध्यक्षांची प्रतिक्रिया

मणिपूरमधील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात RSS गणवेशातील दोन पुरुषांची प्रतिमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे, अनेकांनी असा दावा केला आहे की दोन कुकी महिलांना विवस्त्र करून परेड करणाऱ्या पुरुषांच्या गटात हे दोघेही होते.

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

खोटी माहिती, दावे आणि बातम्यांची बरसात मागील आठवड्यातही सोशल मीडियावर सुरूच राहिली. काँग्रेसच्या बैठकीत चोर ग्रुप असे लिहिलेला बॅनर लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले असा दावा वाढीव पावसाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाला. रहदारी भंग केल्यास सर्व गुन्ह्यांना फक्त १०० रुपये दंड असून यापेक्षा जास्त दंड स्वीकारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, नव्या भारतात रेल्वेला धक्का मारून सुरु करावे लागत आहे. असे दावे करण्यात आले. चांद्रयान-३ च्या उड्डाणाचे विमानातून चित्रित केलेले व्हिडीओ म्हणून दावे व्हायरल झाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Fact Check: चोर ग्रुप बैठकीचे बॅनर एडिटेड आहे

'चोर ग्रुप मीटिंग' असे बॅनर असलेले काँग्रेसच्या सभेचे छायाचित्र व्हायरल होत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ए के अँटोनी हे छायाचित्रात दिसत आहेत. सोशल मीडिया युजर्स दावा करीत आहेत की कोअर ग्रुप असे लिहिण्याऐवजी चोर ग्रुप झाले. पण एकाही विद्वानाला ही घोडचूक लक्षात आली नाही.

इमर्जन्सी अलर्ट आलाय? काळजीची गरज नाही, हे वाचा

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी गुरुवार दि. २० जुलै रोजी एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल. साधा मेसेज म्हणून काहींनी दुर्लक्ष केले असेल मात्र अनेकजण पॅनिकसुद्धा झाले. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर युजर्सनी या अलर्ट बद्दल भाष्य केले. हा ऑनलाईन फ्रॉड आहे का? अशी चर्चा सुरु झाली. अखेर इतर जागरूक युजर्सनी घाबरू नका किंवा हा काळजीचा विषय नाही. अशा आशयाचेही मेसेज पसरविण्यास सुरुवात झाली. जाणून घेऊयात नेमका हा प्रकार काय आहे ते, या एक्सप्लेनरच्या माध्यमातून.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read