Wednesday, May 8, 2024
Wednesday, May 8, 2024

Monthly Archives: June, 2023

ओडिशा ट्रेन अपघातानंतर स्टेशन मास्तर ‘शरीफ’ फरार? नाही, दुःखद अपघातानंतर खोटा दावा व्हायरल

गेल्या आठवड्यात ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ एका एकाहून अधिक-ट्रेनच्या धडकेत किमान २७८ लोकांचा मृत्यू झाला आणि १००० हून अधिक जखमी झाले. सीबीआयने तपास हाती घेतला असताना, अनेक सोशल मीडिया युजर्सनी दावा केला आहे की "कोरामंडल एक्स्प्रेसची टक्कर झाली त्या ठिकाणी नेमले गेलेले आणि तेथील जबाबदारी असणारे स्टेशन मास्टर शरीफ बेपत्ता आहेत.

Fact Check: रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवणाऱ्या मुलाचा हा व्हायरल व्हिडिओ सध्याचा नाही, काय आहे यामागचे सत्य?

रेल्वे रुळावर दगडफेक करणाऱ्या एका मुलाची दोन रेल्वे कर्मचारी चौकशी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Fact Check: बिर्यानी खाताय तर सावधान, सुरु आहे बिर्यानी जिहाद? खोटा आहे हा दावा

बिर्यानी खाताय....तर सावधान! असे सांगणारा एक मेसेज सध्या सर्वत्र मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. कोईमतूर पोलिसांनी एक रॅकेट उघड केले आहे. बिर्यानीमध्ये नपुसकत्वाचे औषध रासायनिक औषध घालून विकणाऱ्यांना अटक झाली आहे. कृपया काळजी घ्या. असे हा दावा सांगतो.

‘स्वीडनला कलंकित करण्यासाठी खोटी माहिती’, स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केल्याच्या रिपोर्टवर देशातील मुख्य क्रीडा संस्थेचा खुलासा

अनेक भारतीय प्रसारमाध्यमांनी अलीकडेच वृत्त प्रसिद्ध केले आहे, ज्यात असे म्हटले आहे की स्वीडनने सेक्सला खेळ म्हणून घोषित केले आहे आणि या आठवड्यात पहिली-वहिली सेक्स स्पर्धा होणार आहे.

राहुल गांधीनी स्वतःला म्हणवले मुस्लिम? एबीपी न्यूजची बनावट ग्राफिक प्लेट पुन्हा होतेय शेयर

एबीपी न्यूजची ग्राफिक प्लेट शेअर करीत दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी त्यांचे पूर्वज आणि स्वतःला मुस्लिम म्हणवून घेतले आहे. राहुल गांधींनी काँग्रेसला मुस्लिमांचा पक्ष म्हटले आहे, असेही पोस्टमध्ये लिहिले आहे.

Fact Check: उत्तनच्या किनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाशी कम्युनल अँगल नाही, तो एक वैयक्तिक कारणाने झालेला खून

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी एका पिशवीत सापडलेल्या शीर नसलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या संदर्भात सोशल मीडियावर अनेक कम्युनल दावे होऊ लागले आहेत. युजर्स या मृतदेहाचे फोटो शेयर करून या घटनेला धार्मिक रंग देऊ लागले आहेत.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही अनेक चुकीची माहिती पसरविणाऱ्या पोस्टनी गाजल्या. सोशल मीडियावर अशा पोस्ट चर्चेत आल्या. भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत असा दावा करण्यात आला. औषधाच्या कॅप्सूलमध्ये खिळे घालून नवा जिहाद सुरु करण्यात आला आहे, असा एक दावा झाला. सरकारने सरपंच आणि उपसरपंचांचे पगार वाढविले असल्याचा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आला. पुण्याच्या यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये रक्ताचा कर्करोग पूर्ण बरा करणारे विनामूल्य औषध मिळते, योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतानला नमन केले आणि सीएसकेच्या विजयानंतर अहमदाबाद येथे 'पिवळे वादळ' उमटले. असे दावे करण्यात आले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: खिळ्यांच्या कॅप्सूलद्वारे जिहाद, काय आहे व्हायरल व्हिडिओमागील सत्य?

सोशल मीडियावर कॅप्सूलमध्ये खिळ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती औषधाचे पॅकेट उघडतो आणि नंतर कॅप्सूल उघडून आतील एक खिळा बाहेर काढतो. कॅप्सूलच्या आणखी एका पॅकेटमध्ये खिळे असल्याचेही दाखवले आहे.

Fact Check: भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत का? इथे वाचा सत्य काय आहे

RBI ने भारतीय चलनातून ₹2000 च्या नोटा मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर अनेक नवीन नोटा आणि नाणी दाखल झाल्याचे दावे पाहायला मिळत आहेत. सध्या भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत असा एक दावा व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read