Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

Monthly Archives: July, 2024

Fact Check: आंध्र प्रदेशातील YSR काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा असल्याचे सांगत व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध एका माणसाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. एका मुस्लीम जिहादीने मुंबईतील धारावीमध्ये बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची निर्घृणपणे हत्या केली. असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Fact Check: आपल्या घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही, असे गडकरी म्हणाले नाहीत. जाणून घ्या सत्य काय आहे

आपल्या घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले, असे सांगणारा दावा त्यांच्या एक भाषणाचा व्हिडीओ घेऊन केला जात आहे. न्यूजचेकरला हा दावा कन्नड भाषेत व्हाट्सअपवर आढळला.

Fact Check: दिल्लीच्या यमुना बाजारमध्ये असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम नाही, वादाचा जुना व्हिडिओ बनावट दाव्यासह होतोय व्हायरल

कावड यात्रेदरम्यान वाटेत येणाऱ्या दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचे आदेश नुकतेच उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आले होते. कावड यात्रेकरूंचा आदर आणि कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान, दिल्लीतील 'राम कचोरी' दुकानाचा मालक मुस्लिम असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Weekly Wrap: शाहू महाराजांची माफी, महाराष्ट्राची निवडणूक आणि मुस्लिम विक्रेत्यांसाठीचा फतवा आदी प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक

एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्यात फेक पोस्टचा पाऊसही सोशल मीडियावर पडतच राहिला. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली, असा दावा करण्यात आला. रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा आहे, असा दावा करण्यात आला. मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, असा दावा करण्यात आला. बांगलादेशमध्ये जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केला आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Fact Check: बांगलादेशातील सत्ताधारी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा व्हिडिओ हिंदू विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा खोटा दावा करीत व्हायरल

बांगलादेशच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता हिंदुविरोधी भूमिका स्वीकारली असून जमात-ए-इस्लामीने ढाका विद्यापीठाच्या हिंदू वसतिगृहावर हल्ला केल्याचा दावा करणारे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Fact Check: केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकण्याचा फतवा काढण्यात आलाय? जाणून घ्या सत्य काय आहे

मुस्लिमांनी केमिकल मिश्रित फळे आणि भाज्या विकाव्यात असा फतवा काढण्यात आला आहे, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

Fact Check: महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? खोटा आहे हा दावा

महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. असे सांगणारा एक दावा एका स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सध्या केला जात आहे.

Fact Check: रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा नाही, जाणून घ्या सत्य काय आहे

रेल्वेस्थानकावर बोगी प्लॅटफॉर्मवर चढून झालेला अपघात सध्याचा असल्याचा भास निर्माण करून एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेअर केला जात आहे. विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पॉईंट आउट करीत हे रेल्वेस्थानक आहे की सर्कस असा सवाल करणारा हा दावा सध्याचाच रेल्वेअपघात असल्याचा समज करून घेऊन अनेक सोशल मीडिया युजर्स पुढे पाठवत आहेत.

Fact Check: आसाममध्ये बलात्कार आणि लव्ह जिहादच्या खोट्या दाव्यासह अनेक वर्ष जुने चित्र होतेय व्हायरल

आसाममध्ये बलात्कार आणि लव्ह जिहादच्या दाव्यासह सोशल मीडियावर एक अस्वस्थ करणारा फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याचे दृश्य आहे. लव्ह जिहादच्या दाव्यासह हे छायाचित्र शेअर केले जात असून आसाममध्ये काजल नावाच्या मुलीवर शम्मी नावाच्या मुस्लिम व्यक्तीने ७ जणांसह बलात्कार केला आणि फ्रीझमध्ये पॅक केले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे.

Fact Check: खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली? खोटा आहे हा दावा

कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिमांची कान धरून माफी मागितली असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. विशेषतः कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना तसे करायला लावले असे हा दावा सांगतो.

CATEGORIES

ARCHIVES

Most Read